भुवनेश्वर कुमारची कमाल कामगिरी; पीयूष चावलाला मागे टाकत IPL आणि T20 क्रिकेटमध्ये गाठले शिखर

आयपीएल 2025 च्या 46 व्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीने चमत्कार केला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 3 बळी घेत भुवनेश्वरने एक उत्तम कामगिरी केली. भुवीने 4 षटकांत 33 धावा दिल्या आणि केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशाप्रकारे, त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत पियुष चावलाला मागे टाकले. भुवी आता आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या नावावर आता 193 आयपीएल बळी आहेत. भुवीने आयपीएलच्या 185 व्या सामन्यात ही मोठी कामगिरी केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर आहे. चहलने 169 आयपीएल सामन्यांमध्ये 214 बळी घेतले आहेत.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
214 – युझवेंद्र चहल
193 – भुवनेश्वर कुमार*
192 – पियुष चावला
187 – सुनील नारायण
185 – रवी अश्विन
183 – ड्वेन ब्राव्हो

टॉन्स हरल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी केली आणि 72 धावांच्या आत 3 महत्त्वाचे विकेट्स गमावले. त्यानंतर, चौथी विकेट अक्षर पटेलच्या रूपात 102 धावांच्या संघाच्या धावसंख्येवर पडली. भुवनेश्वर कुमारला अपवे विकेटचे खाते उघडण्यासाठी थोडी वाट पहावी लागली.

भुवनेश्वर कुमारने 17 व्या षटकात केएल राहुलला बाद करून पहिली विकेट घेतली. यासह, त्याने टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत पियुष चावलाला मागे टाकले. भुवी आता टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे तर पियुष चावला तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. भुवनेश्वरने आता टी20 क्रिकेटमध्ये 322 विकेट्स घेतल्या आहेत. आता त्याच्या पुढे फक्त युजवेंद्र चहल आहे. चहलने टी-20 मध्ये 373 बळी घेतले आहेत.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे भारतीय गोलंदाज
373 – युझवेंद्र चहल
322 – भुवनेश्वर कुमार*
319 – पियुश चावला
315 – रविचंद्रन अश्विन
304 – जसप्रीत बुमराह
285 – अमित मिश्रा

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकांत 8 बळी गमावल्यानंतर फक्त 162 धावा करता आल्या. दिल्लीकडून केएल राहुलने सर्वाधिक 41 धावा केल्या तर ट्रिस्टन स्टब्सने 34 धावा केल्या. भुवीने 3 बळी घेतले. त्याच वेळी जोश हेझलवूडने 2 बळी घेतले. यश दयाल आणि कृणाल पंड्याला प्रत्येकी एक बळी मिळाला.

Comments are closed.