दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वनिवडीचा तिढा सुटला! राहुलच्या नकारानंतर अक्षरचा होकार
अवघ्या आठवडय़ावर आलेल्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा नेतृत्वनिवडीचा तिढा सुटला असून के. एल. राहुलने नाकारलेले कर्णधारपद अखेर अक्षर पटेलने स्वीकारले आहे. त्यामुळे आयपीएल संघांच्या कर्णधारांचे दशक पूर्ण झाले आहे.
येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या 18 व्या हंगामाची सुरुवात होतेय. त्यामुळे सध्या सर्व संघ आपापल्या मैदानांवर सरावात घाम गाळताना दिसताहेत. आयपीएलच्या इतर संघाचे कर्णधार कोण असणार? याचे चित्र वेळेआधीच स्पष्ट झाले होते, मात्र दिल्लीचा कर्णधारपदी कोण असेल याची कोणालाही कल्पना नव्हती.
मात्र गेल्या वर्षी लखनौ संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या के. एल. राहुलकडेच ती जबाबदारी असेल, असा साऱ्यांचा अंदाज होता. पण राहुलने स्वतःच हे पद घेण्यास नकार दर्शवल्यामुळे दिल्लीच्या संघव्यवस्थापनाचा नव्या नेतृत्वासाठी शोध सुरू झाला होता आणि अक्षर पटेलच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. आज दिल्लीच्या संघ व्यवस्थापनाने ज्याच्या नावाची चर्चा होती आणि ज्याने नुकतीच झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली त्या अक्षर पटेलला कर्णधारपदाची ऑफर दिली. राहुलने नाकारलेल्या कर्णधारपदाला अक्षरने स्वीकारल्यामुळे या मोसमात दिल्लीला नवे अष्टपैलू नेतृत्व गवसले आहे.
एन दिल्ली कॅपिटल्स संघ अक्षर पटेल (कर्नाधार), कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टॅब्स, अभिषेक पोरेल, मिशेल स्टार्क, के.के. एल. राहुल, जेक फ्रेझर-मकगार्क, टी. नराजन, करुन नायर, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, फाफ डु प्लेसिस, मुकेश कुमार, दर्शन नलकांडे, विप्रज निगम, डुश्मण, डोनोव्हान, डोनोव्हान
Comments are closed.