IPL 2025: आयपीएल कधी सुरू होणार? पहा नवी अपडेट
यंदाचा आयपीएल (IPL 2025) हंगाम पुन्हा सुरू करण्याबाबत उद्या म्हणजेच (11 मे) रोजी निर्णय घेतला जाऊ शकतो. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावबंदीच्या करारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी (10 मे) संध्याकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान दोन्हीकडून गोळीबार थांबवण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला की, आयपीएल 2025 स्पर्धा पुढील आठवड्यात पुन्हा सुरू होऊ शकते. प्लेऑफ स्टेजपूर्वी स्पर्धेत 13 सामने (पंजाब-दिल्ली सामन्यासह) खेळायचे आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार आयपीएल गुरूवारी (15 मे) किंवा शुक्रवारी (16 मे) सुरू होण्याची शक्यता आहे.
आयपीएल 2025 मध्ये (8 मे) रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) सामना खेळवण्यात येत होता. सामन्यात फक्त 10.1 षटकांचा खेळ होऊ शकला, त्यानंतर तांत्रिक बिघाडाचे कारण देत सामना थांबवण्यात आला आणि काही वेळाने मैदानही रिकामे करण्यात आले. नंतर आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंग धुमाळ यांनी खुलासा केला की मैदानात चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून तांत्रिक बिघाडाचा अवलंब करण्यात आला.
दरम्यान, ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी 3 मैदाने निवडली जाऊ शकतात. ही 3 मैदाने बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियम, चेन्नईमधील चेपाॅक आणि हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम असू शकतात. आयपीएल 2025 पुन्हा सुरू करण्याची तारीख ठरवण्यासाठी बीसीसीआयचे अधिकारी लवकरच बैठक घेऊ शकतात, अशीही माहिती आहे.
🚨 आयपीएल 2025 पुढील आठवड्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे 🚨 [Sports Tak] pic.twitter.com/gpczaiir5n
– जॉन्स. (@Criccrazyjhons) 10 मे, 2025
🚨 आयपीएल 2025 गुरुवारी किंवा शुक्रवारी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे 🚨 [Sahil Malhotra from TOI] pic.twitter.com/kqkrj0w0ak
– जॉन्स. (@Criccrazyjhons) 10 मे, 2025
Comments are closed.