गिलचा चमकदार शो! केकेआरला घाम फोडत गुजरातची विजयी घौडदौड सुरूच!
गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला आणखी एक दारुण पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएल 2025च्या 39 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकात्याचा 39 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे कोलकात्याला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या हंगामात कोलकाताचा 8 सामन्यांमधील हा पाचवा पराभव आहे.
प्रथम फलंदाजी करताना गुजरातने कर्णधार शुबमन गिलच्या स्फोटक खेळीच्या जोरावर 3 गडी गमावून 198 धावा केल्या. शुबमन गिल त्याच्या शतकापासून 10 धावा कमी पडला, त्याने 55 चेंडूत 90 धावा केल्या. ज्यात 10 चाैकार व 3 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
आजूबाजूला चमकदार क्रिकेट 👏
शुबमन गिलच्या 90 (55) च्या कल्पित डाव संपविण्यासाठी विशेष झेल आवश्यक आहे.
अद्यतने ▶ https://t.co/twaiwd5d6n#Takelop | #Kkrvgt | @Kkriders | @gujarat_titans pic.twitter.com/4rsuiopcnx
– इंडियनप्रिमियरलीग (@आयपीएल) 21 एप्रिल, 2025
लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजने रहमानुल्ला गुरबाजला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. संघाने 6 षटकांत 2 गडी गमावले. मधल्या षटकांमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण त्यांना धावांचा वेग वाढवता आला नाही. परिणामी फलंदाजांवर दबाव वाढत गेला आणि मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करताना ते बाद होऊ लागले. केकेआरने मर्यादित 20 षटकात 8 गडी गमावून 158 धावाच करता आल्या.
Comments are closed.