IPL 2025 – कुलदीप यादवनं रिंकू सिंहला कानफटवलं; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांना हरभजन-श्रीसंतचा 2008 चा किस्सा आठवला
इंडियन प्रीमियर लीगचा अर्धा हंगाम संपला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून जवळपास बाद झाले आहेत. उर्वरित 8 संघामध्ये प्ले ऑफच्या 4 जागांसाठी रस्सीखेच सुरू असून मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सामना पार पडला. या लढतीनंतर एक वादग्रस्त घटना समोर आली आहे.
दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादव याने कोलकाताचा बॅटर रिंकू सिंह याला दोन वेळा कानाखाली मारली. पहिल्यांदा कानाखाली मारल्यानंतर रिंकू सिंह हसताना दिसला, पण कुलदीपने पुन्हा एकदा कानाखाली मारल्यानंतर मात्र रिंकूच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले. या घटनेचा व्हिडीओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांना नेटकऱ्यांना हरभजन-श्रीसंतचा 2008 चा किस्सा आठवला आहे. अर्थात त्यावेळी प्रकरण खूपच तापले होते.
कुलदीप यादव रिंकू सिंगला दोनदा थाप मारली 😭😭 pic.twitter.com/uwafrga4yx
– केशव ऑल्टएक्स (@कोहलिगोएट 82 एक्स) 29 एप्रिल, 2025
कुलदीप-रिंकूमध्ये नेमके काय झाले?
अरुण जेटली मैदानावर झालेल्या लढतीत दिल्लीचा पराभव झाला. कोलकाताने हा सामना 14 धावांनी जिंकला. सामना संपल्यानंतर दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादव लाईव्ह टीव्हीवर कोलकाताचा बॅटर रिंकू सिंह याला दोनदा कानाखाली मारतो.
सामना संपल्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशनवेळी कुलदीप, रिंकूसह अन्य खेळाडूही उपस्थित होते. यादरम्यान कुलदीप रिंकूला एकदा कानाखाली मारतो. पहिल्यांदा तो हसण्यावारी नेतो, पण नंतर पुन्हा एकदा कुलदीप त्याच्या कानाखाली मारतो. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि त्याच्या डोळ्यांमध्ये राग स्पष्ट दिसतो. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
IPL 2025 – ‘टोपी’ची अशी ही पळवापळवी! साई सुदर्शनने कोहलीकडून ऑरेंज कॅप खेचून घेतली
या व्हिडीओला ऑडियो नसल्याने दोघांमध्ये नक्की काय घडले हे स्पष्ट झालेले नाही. मात्र कुलदीपच्या या व्यवहारामुळे नेटकऱ्यांनी त्याच्याविरोधात वादळ उठवले असून काहींनी तर थेट त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी बीसीसीआयकडे केली आहे.
नुकताच हा व्हिडिओ पाहिला. जरी ते मजेदार किंवा बॅनर असले तरीही ते स्वीकार्य वर्तन नाही. हे एक कामाचे ठिकाण आहे हे विसरू नका. आणि या प्रकारचे वर्तन एखाद्या कामाच्या ठिकाणी पूर्णपणे अस्वीकार्य आहे.
मी विनंती @बीसीसीआय @आयपीएल कुलदीप यादव यांच्याविरूद्ध कारवाई करणे.pic.twitter.com/jwforbarl– किट (@केईआयआय_) 29 एप्रिल, 2025
कुलदीप यादवला सार्वजनिकपणे अशा प्रकारे रिंकूला चापट मारण्याचा आत्मविश्वास काय आहे?
केएल राहुल नंतर कुलदीप फसवणूकीच्या यादीमध्ये 2 रा आहे. कधीही दबाव आणला नाही 🤡
त्याला बंदी द्या @बीसीसीआय#Viratkohli #Ipl2025 #आयपीएल #Kkrvsdc pic.twitter.com/7dvcn0b39l
– धर्म घड्याळ (@dharma_watch) 29 एप्रिल, 2025
Comments are closed.