IPL 2025 – संघात 3 कॅप्टन असल्याचा फायदा, 4 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य! – हार्दिक पंड्या
मुंबई इंडियन्सची तयारी जोरात सुरू आहे. प्रमुख खेळाडू संघाची जोडले गेले असून वानखेडेवर कसून सराव सुरू झालेला आहे. यंदाही मुंबईची धुरा हार्दिक पंड्याचा खांद्यावर असणार आहे. अर्थात गेल्यावर्षी स्लो ओव्हर रेट मुळे हार्दिक वर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तो यंदा सलामीच्या लढतीला मुकणार आहे. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव मुंबईचे नेतृत्व करेल. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिकने स्वतः ही माहिती दिली. यावेळी त्याने अनेक पैलूंवर भाष्य केले.
आगामी हंगामामध्ये चांगले क्रिकेट खेळण्यावर आमचे लक्ष आहे. संघातील वातावरण उत्तम राखून आणि योग्य त्या योजना आखून त्यानुसार खेळण्याला आमचे प्राधान्य असेल. तसेच खेळाचा आनंद घेणे आणि प्रत्येक सामन्याला तितकेच महत्त्व देणे ही गरजेचे आहे असेही हार्दिक पंड्या म्हणाला.
गेल्या नऊ महिन्यांमध्ये टीम इंडियाने दोन आयसीसी स्पर्धांवर मोहर उमटली. याबाबत बोलताना तो म्हणाला की देशासाठी खेळण्याहून अधिक मोठे काहीच नाही. दोन आयसीसी स्पर्धा सलग जिंकण्याचा आनंद नक्कीच आहे. आता मुंबई संघाचा चार वर्षापासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य आमच्यासमोर आहे.
IPL 2025 – पहिल्या लढतीला हार्दिक पंड्या मुकणार, रोहित नाही तर ‘हा’ खेळाडू मुंबईची धुरा सांभाळणार
दोन आयसीसी स्पर्धा जिंकल्याने माझा आत्मविश्वास उंचावलेला आहे. गेले काही वर्षात आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले आहेत. पण नव्या वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या असून जिंकण्याची जिद्द कायम आहे. माझ्या संघातील खेळाडूंना जितकी मदत करता येईल तितकी मी करणार आहे तसेच संघात तीन कर्णधार असणे हे माझे भाग्य आहे. तिघांच्याही गाठीशी बराचा अनुभव असून त्याचा नक्कीच फायदा होईल असेही हार्दिक म्हणाला.
– तीन कर्णधार संघात असणे हे माझे भाग्य. त्याच्या गाठीशी बराच अनुभव. त्यांची नक्कीच मदत होईल.
टीम कॉम्बिनेशन बाबत विचारले असता हार्दिक म्हणाला की, लिलावावेळी अनुभवी गोलंदाजांना संघात घेण्यावर आमचे लक्ष केंद्रित होते. कारण वानखेडे वर गोलंदाजी करणे सोपे नाही. मुंबई इंडियन्सला मोठा वारसा लाभलेला आहे, मैदानात उपस्थित फॅन्सीच्याही मोठ्या अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण करण्याचे दडपण असते. मात्र याचा आनंद घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मी मैदानात उतरेल तेव्हा, फलंदाजी करेल तेव्हा मला नक्कीच चिअर करा.
IPL 2025 – जसप्रीत बुमराह खेळणार की स्पर्धेला मुकणार, कोच महेला जयवर्धने यांनी दिली मोठी अपडेट
Comments are closed.