10 षटकार 16 चाैकार, IPL 2025पूर्वी रियान परागची वादळी खेळी

आयपीएल 2025 चे काउंटडाउन सुरू झाले आहे, 22 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे. त्याआधी सर्व संघ सराव सामने खेळत आहेत. राजस्थान रॉयल्सच्या सराव सामन्यात फलंदाज रियान परागने स्फोटक फलंदाजी केली, त्याने 64 चेंडूत नाबाद 144 धावा केल्या.

रियान परागने 144 धावांच्या स्फोटक खेळीत 10 षटकार आणि 16 चौकार मारले. पराग हा राजस्थान रॉयल्ससाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे, त्याच्या फॉर्ममुळे संजू सॅमसन आणि संघाला खूप दिलासा मिळेल. राजस्थान रॉयल्स आयपीएल2025 मध्ये त्यांचा पहिला सामना 23 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळेल.

2019 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या रियान परागने आतापर्यंत स्पर्धेत 70 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 135 च्या स्ट्राईक रेटने 1173 धावा केल्या आहेत. रियान परागचा आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 84 धावा आहे. या स्पर्धेत त्याने 6 अर्धशतकी खेळी खेळल्या आहेत.

आयपीएल 2025 साठी राजस्थान रॉयल्सचा संघ

संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, कुणाल सिंग राठोड, रियान पराग, युद्धवीर सिंग चरक, नितीश राणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, आकाश माधवाल, कुमार कार्तिकेय, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, महेश थेक्साना, फजलहक फारुकी, अशोक शर्मा, जोफ्रा आर्चर.

Comments are closed.