आयपीएल 2025: राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजी विभागाला नव्या प्रशिक्षकाची साथ!

आयपीएल 2025 हंगाम सुरू होण्यापूर्वी राजस्थान राॅयल्सच्या कॅम्पमधून मोठी माहिती समोर येत आहे. वास्तविक, माजी भारतीय फिरकी गोलंदाज साईराज बहुतुले यांची राजस्थान रॉयल्सच्या फिरकी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधीही साईराज बहुतुले यांनी राजस्थान रॉयल्ससोबत काम केले आहे. सध्या तो बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम करत आहे. परंतु लवकरच तो राजस्थान रॉयल्समध्ये सामील होईल.

जेव्हा राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. तेव्हा साईराज बहुतुले यांनी टीम इंडियासोबत फिरकी सल्लागार म्हणून काम केले. याशिवाय, साईराज बहुतुले यांनी राजस्थान रॉयल्ससोबत 4 हंगाम काम केले आहे. तो आयपीएल 2018 च्या हंगामापासून आयपीएल 2021 पर्यंत राजस्थान रॉयल्सशी संबंधित होता. तर साईराज बहुतुलेने 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून पदार्पण केले.

आता राजस्थान रॉयल्समध्ये साईराज बहुतुले मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि गोलंदाजी प्रशिक्षक न्यूझीलंडचे शेन बाँड यांच्यासोबत काम करतील. क्रिकबझशी बोलताना साईराज बहुतुले म्हणाले की, सध्या चर्चा सुरू आहे. मी फ्रँचायझीमध्ये सामील होण्याच्या जवळ आहे. राजस्थान रॉयल्सशी पुन्हा एकदा जोडले जाण्यासाठी मी उत्सुक आहे. तसेच, राहुल द्रविडसोबत काम करणे हा एक आनंददायी अनुभव आहे.

साईराज बहुतुले म्हणाले की, गेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेदरम्यान, राहुल द्रविडनेच मला भारतीय संघाशी जोडले होते. त्यावेळी मी फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होतो. याशिवाय, मी श्रीलंकेत त्याच्या कोचिंग स्टाफचाही भाग होतो. 2 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, साईराज बहुतुलेने 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

हेही वाचा-

Ranji Trophy: अंतिम चारसाठी तीव्र लढत, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला!
सूर्यकुमार यादवला पुनरागमनाची संधी, रणजी ट्रॉफीत सूर्या चमकणार का?
टीम इंडियाचा अभिमान! बीसीसीआयकडून विश्वविजेत्यांसाठी खास “चॅम्पियन्स रिंग”!

Comments are closed.