IPL सह टी20 मध्येही वैभव सूर्यवंशी ठरला सर्वात तरुण शतकवीर; भारतीय खेळाडूचाच मोडला विक्रम!
राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने फक्त 35 चेंडूत शतक झळकावले आहे. हे शतक गुजरात टायटन्सविरुद्ध वैभवने झळकावले. फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी आलेल्या वैभवने 11 व्या षटकातच आपले शतक पूर्ण केले. गुजरातकडे मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रशीद खान, करीम जनात आणि प्रसीद कृष्णासारखे गोलंदाज आहेत. सगळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात पण तरीही वैभवसमोर ते काहीही करू शकले नाहीत.
वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. तो कोणत्याही मान्यताप्राप्त टी-20 सामन्यात शतक करणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्याने ही शतकी खेळी 14 वर्षे 32 दिवसांच्या वयात खेळली. त्याने भारताच्या विजय झोलचा विक्रम मोडला आहे. महाराष्ट्राकडून खेळताना झोलने 2013 मध्ये 18 वर्षे 118 दिवसांच्या वयात मुंबईविरुद्ध शतक झळकावले. झोल 2014 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधारही होता.
टी-20 मध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू –
14 वर्षे 32 दिवस, वैभव सूर्यवंशी, आरआर विरुद्ध जीटी (2024)
18 वर्षे 118 दिवस, विजय झोल, महाराष्ट्र विरुद्ध मुंबई (2013)
18 वर्षे 179 दिवस, परवेझ हुसैन इमॉन, बारिशाल विरुद्ध राजशाही (2020)
18 वर्षे 280 दिवस, गुस्ताव्ह मकौन, फ्रान्स विरुद्ध स्वित्झर्लंड (2022)
18 वर्षे 282, गुस्ताव मक्कन, नॉर्वे फ्रान्स विरूद्ध (2022)
बांगलादेशचा परवेझ हुसेन इमॉन शतक ठोकणाऱ्या सर्वात तरुण फलंदाजांच्या यादीत आहे. 2020 मध्ये बांगलादेशात झालेल्या देशबंधू टी20 कपमध्ये त्याने फॉर्च्यून बारिशालकडून मिनिस्टर राजशाहीविरुद्ध शतक झळकावले. गुस्ताव मॅककॉन हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा फलंदाज आहे. 2022 मध्ये, फ्रान्सकडून खेळताना, त्याने 18 वर्षे आणि 280 दिवसांच्या वयात स्वित्झर्लंडविरुद्ध शतक झळकावले.
Comments are closed.