IPL 2026 स्पर्धेच्या 4 नव्या नियमांबाबत मोठी अपडेट समोर! कोणत्या संघाची सरशी होणार आणि कोणाला बसणार फटका?

आयपीएल 2026 (Indian premiere league 2026) चा थरार 28 मार्च पासून सुरू होणार आहे. सर्व क्रिकेटप्रेमी या तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्पर्धेच्या काही नियमांमध्ये बदल झाला आहे की नाही याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

स्पर्धेतील इम्पॅक्ट प्लेयर’चा नियम याही वर्षी कायम असून, तो 2027 पर्यंत बदलला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, दव (Dew) आणि चेंडू बदलण्याचा सामन्यादरम्यान पडणाऱ्या दव समस्येवर मात करण्यासाठी आता दोन नवीन चेंडूंचा वापर केला जाईल. विशेष म्हणजे, डावातील 11 व्या षटकानंतर चेंडू बदलला जाऊ शकतो, जेणेकरून गोलंदाजांना चेंडूवर पकड मिळवणे सोपे जाईल.

आता केवळ विकेटसाठीच नाही, तर वाईड बॉल (Wide Ball) आणि नो बॉल (No Ball) साठी देखील खेळाडू डीआरएस (DRS) घेऊ शकतील. हा अधिकार फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या दोन्ही संघांना असेल. याचबरोबर आयपीएल प्रशासनाने स्लो ओव्हर रेटच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल कोणत्याही खेळाडूवर बंदी (Ban) घातली जाणार नाही. यामुळे कर्णधारांवरील दबाव काहीसा कमी होईल. थोडक्यात सांगायचे झाल्यास, 2026 चा आयपीएल हंगाम अधिक हाय-टेक आणि खेळाडूंसाठी सोयीस्कर होणार आहे.

Comments are closed.