टूर्नामेंट सुरू होण्याआधीच गेम ओव्हर; 7 खेळाडू OUT, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी वाढवली चिंता, कोण भरण
IPL 2026 अपडेट बातम्या : आयपीएल (IPL 2026) चा काउंटडाउन सुरू झाला असून स्पर्धेला आता अवघा आठवडा उरला आहे. मात्र स्पर्धा सुरू होण्याआधीच अनेक संघांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल 7 खेळाडू बाहेर पडल्याने काही संघांची डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे या 7 पैकी 6 खेळाडू हे वेगवान गोलंदाज आहेत. यात 4 ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश असून, ज्यांना घेणाच्यासाठी लिलावात मोठी लढत रंगली होती. यामधील एक खेळाडू आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणार होता, तर एक खेळाडू भारतीय आहे.
आयपीएल 2026 चा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. या दोन्ही संघांना आपल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची उणीव जाणवणार आहे. बाहेर पडलेल्या खेळाडूंमध्ये पॅट कमिन्स (SRH) आणि जोश हेजलवूड (RCB) यांचा समावेश आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचे नॅथन एलिस (CSK) आणि जॅक एडवर्ड्स (SRH) हेही स्पर्धेबाहेर गेले आहेत.
सुरुवातीच्या सामन्यांमधून 3 खेळाडू बाहेर
आयपीएल 2026 मधून बाहेर पडलेल्या 7 खेळाडूंमध्ये 6 वेगवान गोलंदाज आहेत. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे यापैकी 3 गोलंदाज पूर्ण स्पर्धेतून नव्हे तर फक्त सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर आहेत. पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि लॉकी फर्ग्युसन हे सुरुवातीच्या काही सामन्यांत खेळू शकणार नाहीत.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स अजून दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. याच दुखापतीमुळे तो टी-20 वर्ल्ड कपलाही मुकला होता. तर जोश हेजलवूडही दुखापतग्रस्त असून, तो आरसीबीसाठी सुरुवातीचे 2 सामने गमावणार असल्याची माहिती आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला पंजाब किंग्सने खरेदी केले आहे. मात्र राष्ट्रीय कर्तव्यामुळे तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे.
भारतीय गोलंदाजाचाही समावेश
भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा देखील दुखापतीमुळे आयपीएल 2026 मध्ये खेळू शकणार नाही. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता.
याशिवाय सॅम करन, जॅक एडवर्ड्स आणि नॅथन एलिस हेही संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. सॅम करन ट्रेडद्वारे राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला होता, मात्र कंबरेच्या दुखापतीमुळे तो बाहेर पडला. नॅथन एलिस हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे सीएसकेसाठी खेळू शकणार नाही. तर जॅक एडवर्ड्स, जो आयपीएलमध्ये पदार्पण करणार होता, तोही दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.