IPL 2026 Auction – कॅमरून ग्रीन कोलकाताच्या ताफ्यात; 25.20 कोटींची बोली, पण मिळणार फक्त 18 कोटी

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी मिनी लिलाव अबुधाबीत रंगला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन याच्यावर सर्वाधिक बोली लागली. त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात रस्सीखेच पाहायला मिळाली. कोलकाताने 25.20 कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावत ग्रीनला आपल्याकडे खेचले. आयपीएलच्या इतिहासामध्ये कोणत्याही विदेशी खेळाडूसाठी लागलेली ही सर्वाधिक बोली आहे. मात्र एवढी बोली लागूनही ग्रीनला फक्त 18 कोटी रुपयेच मिळणार आहेत.

Comments are closed.