आयपीएलचा डिसेंबर धमाका! ऑक्शनची तारीख ठरली, खेळाडूंना कायम ठेवण्याची ‘ही’ शेवटची तारीख


आयपीएल 2026 लिलाव अद्यतनः आयपीएल 2026 साठीची तयारी जोमात सुरू झाली आहे. जरी पुढचा हंगाम अजून थोडा लांब असला, तरी त्याआधी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया आणि त्यापूर्वी रिटेन्शनची अंतिम यादी तयार होणार आहे. दरम्यान, पुढील आयपीएल हंगामापूर्वीच्या काही महत्त्वाच्या तारखा समोर आल्या आहेत.

13 ते 15 डिसेंबरदरम्यान होऊ शकतो आयपीएल लिलाव (IPL 2026 auction likely around December 15)

आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी लिलाव पार पडणार आहे. मात्र, या वेळचा लिलाव मेगा नसून मिनी ऑक्शन असेल. क्रिकबझच्या अहवालानुसार, 13 ते 15 डिसेंबरदरम्यान कोणत्याही दिवशी हा लिलाव पार पडू शकतो. अद्याप बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने नेमकी तारीख निश्चित केलेली नाही, पण याच कालावधीत अधिकृत घोषणा होईल, अशी शक्यता आहे.

गेल्या दोन हंगामांमध्ये आयपीएलचा लिलाव भारताबाहेर झाला होता, पण यंदा तसं होणार नाही असं दिसतंय. म्हणजेच या वेळी लिलाव भारतातच होईल. लिलावाचे स्थळ कोलकाता किंवा बंगळुरू असू शकते. मात्र, बीसीसीआयने एखाद नवं वेन्यू ठरवलं, तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.

15 नोव्हेंबरपर्यंत संघांना रिटेन्शनची डेडलाइन (IPL 2026 auction retention deadline on November 15)

आयपीएल संघांना त्यांच्या आवडीचे खेळाडू ठेवण्यासाठी म्हणजेच रिटेन करण्यासाठीची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी संध्याकाळपर्यंत सर्व दहा संघांनी आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सादर करावी लागेल. या दिवशीच कोणत्या संघाने कोणाला ठेवले आणि कोणाला सोडले, हे स्पष्ट होईल. साधारणतः मिनी ऑक्शनच्या आधी संघ फारसे मोठे बदल करत नाहीत.

राजस्थान आणि चेन्नईकडे सर्वांचे लक्ष

आयपीएल 2025 हंगामात कमकुवत प्रदर्शन करणारे संघ राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्याकडे सर्वांचे लक्ष असेल. या दोन्ही संघांत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काही इतर संघ देखील बदलाच्या मूडमध्ये आहेत, मात्र अजून मोठ्या खेळाडूंची नावे समोर आलेली नाहीत. तारखा निश्चित झाल्यानंतर आता सर्व संघ खेळाडूंशी बोलणी करून आपापला अंतिम संघ ठरवण्याच्या तयारीत आहेत.

हे ही वाचा –

Hardik Pandaya- Mahieka Sharma News : पांड्या भाऊ झिंगाट… एअरपोर्टवर गर्लफ्रेंडला हात पकडायचा होता, पण कॅमेऱ्यांना पाहून हार्दिकने काय केलं? Video Viral

आणखी वाचा

Comments are closed.