आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती

IPL 2026 लिलाव: आयपीएल 2026 चा मिनी लिलाव आज (16 डिसेंबर) अबू धाबी (IPL 2026 Auction) येथे होणार आहे. आयपीएलच्या या मिनी लिलावात एकूण 350 खेळाडू सहभागी होतील. कॅमेरॉन ग्रीन, व्यंकटेश अय्यर आणि लियाम लिव्हिंगस्टोन सारखी अनेक मोठी नावे लिलावात समाविष्ट आहेत. तसेच या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयपीएल 2026 च्या लिलावात कोणत्या संघाकडे किती रुपये शिल्लक आहेत, हे जाणून घ्या. (IPL 2026 Auction)

कोलकाता नाईट रायडर्स (KKR पर्स बॅलन्स 2026)

उर्वरित स्लॉट्स – 13
पर्स बॅलन्स – 64.3 कोटी रुपये

चेन्नई सुपर किंग्ज (CSK पर्स बॅलन्स 2026)

उर्वरित स्लॉट्स – 9
पर्स बॅलन्स – 43.4 कोटी रुपये

सनरायझर्स हैदराबाद (SRH पर्स बॅलन्स 2026)

उर्वरित स्लॉट्स – 10
पर्स बॅलन्स – 25.5 कोटी रुपये

लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी पर्स बॅलन्स 2026)

उर्वरित स्लॉट्स – 6
पर्स बॅलन्स – 22.95 कोटी रुपये

दिल्ली कॅपिटल्स (DC पर्स बॅलन्स 2026)

उर्वरित स्लॉट्स – 8
पर्स बॅलन्स – 21.8 कोटी रुपये

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB पर्स बॅलन्स 2026)

उर्वरित स्लॉट्स – 5
पर्स बॅलन्स – 16.4 कोटी

राजस्थान रॉयल्स (RR पर्स बॅलन्स 2026)

उर्वरित स्लॉट्स – 9
पर्स बॅलन्स – 16.05 कोटी

गुजरात टायटन्स (GT पर्स बॅलन्स 2026)

उर्वरित स्लॉट्स – 6
पर्स बॅलन्स – 12.9 कोटी

पंजाब किंग्ज (PBKS पर्स बॅलन्स 2026)

उर्वरित स्लॉट्स – 4
पर्स बॅलन्स – 11.5 कोटी

मुंबई इंडियन्स (MI पर्स बॅलन्स 2026)

उर्वरित स्लॉट्स – 5
पर्स बॅलन्स – 2.75 कोटी

10 संघांकडे 77 खेळाडूंसाठी जागा- (IPL 2026 Auction)

  1. चेन्नई सुपर किंग्स: 9 (4 परदेशी खेळाडू)
  2. दिल्ली कॅपिटल्स: 8 (5 परदेशी)
  3. गुजरात टायटन्स: 5 (4 परदेशी)
  4. कोलकाता नाईट रायडर्स: 13 (6 परदेशी)
  5. लखनौ सुपर जायंट्स: 6 (4 परदेशी)
  6. मुंबई इंडियन्स: 5 (1 परदेशी)
  7. पंजाब किंग्ज: 4 (2 परदेशी)
  8. राजस्थान रॉयल्स: 9 (1 परदेशी)
  9. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: 8 (2 परदेशी)
  10. सनरायझर्स हैदराबाद: 10 (2 परदेशी)

237.55 कोटींची बोली, 359 खेळाडू मैदानात- (IPL 2026 Auction Marathi News)

आयपीएल लिलावासाठी सर्व संघांकडे मिळून एकूण 237.55 कोटी रुपयांचा पर्स उपलब्ध आहे. मिनी ऑक्शनमध्ये कमाल 77 खेळाडू खरेदी करता येणार असून, एकूण 359 खेळाडू लिलावात उतरले आहेत. यापैकी जास्तीत जास्त 31 परदेशी खेळाडूंनाच करार मिळू शकतो, तर लिलावात 110 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएल 2026 मिनी ऑक्शनपूर्वी प्रत्येक संघाकडे उरलेला पर्स किती आहे, तसेच अजून किती खेळाडू संघात घ्यायचे आहेत, यावरून कोणता संघ किती आक्रमक खेळी करतो, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

संबंधित बातमी:

IPL 2026 Auction : 237.55 कोटींची बोली, 77 जागांसाठी 359 खेळाडू मैदानात! चेन्नई-मुंबईकडे किती पैसे?, IPL लिलावापूर्वी जाणून घ्या सर्वकाही

आणखी वाचा

Comments are closed.