आयपीएल 2026 साठी बीसीसीआयचे नवे नियम! स्लीव्हलेस जर्सी चालणार नाही, फ्रॅंचायजींची डोकेदुखी वाढली

आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यास काहीच दिवस बाकी असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कठोर नियमावली तयार केली आहे. संघ व्यवस्थापकांना पाठवलेल्या सुचनेनुसार बीसीसीआयने आयपीएल २०२६ मध्ये सामन्यांच्या दिवशी संघांना सराव सत्र घेण्यास मनाई केली आहे. असे आणखी काही नियम लागू केल्याने १० संघांमध्ये खळबळ उडाली आहे.
आयपीएल २०२६ साठी बीसीसीआयचे नियम-
१. सामन्याच्या दिवशी सराव नाही- कोणत्याही संघाला सामन्याच्या दिवशी सराव करता येणार नाही.
२. नेट शेअरिंग बंदी – कोणताही संघ दुसऱ्या संघाचे प्रक्टिस नेट्स वापरू शकणार नाही, कारण प्रत्येक संघासाठी स्वतंत्र नेट्सची व्यवस्था केली जाईल.
३. खेळपट्टी वापराबाबत नियम – यजमान संघ ज्या खेळपट्टीवर पहिला सामना खेळणार आहे, त्या खेळपट्टीवर ४ दिवस आधीपासूनच कोणताही सराव करता येणार नाही.
४. फ्लॉपीज आणि बाह्या नसलेल्या जर्सींना परवानगी नसेल.
५. ‘फ्लॉपीज’ (Floppies) किंवा बाह्या नसलेले कपडे (स्लीव्हलेस जर्सी) परिधान करण्याच्या पहिल्या उल्लंघनावर ताकीद दिली जाईल. दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास आर्थिक दंड आकारणार.
६. कुटुंबीयासोबत प्रवासाला बंदी – खेळाडूंना त्यांच्या परिवारासोबत किंवा मित्रांसोबत प्रवास करण्याची परवानगी नाही. सराव किंवा सामन्यासाठी खेळाडूंना संघाच्या बसमधूनच प्रवास करावा लागेल.
रेंज हिटींग, रन-अप आणि इतर ड्रिल्ससाठी वेगळे विकेट्स दिले जाणार. सलग सराव करणाऱ्या संघासाठी प्रत्येकवेळी नवीन खेळपट्टी तयार केले जाईल. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला मैदानावरील LEB बोर्डजवळ बसण्यास बंदी घालण्यात आली आहे, असेही नियम त्यामध्ये समाविष्ट आहेत.
Comments are closed.