IPL 2026: MI विरुद्धच्या विजयानंतर RCB च्या हेड कोचला बीसीसीआयने सुनावली शिक्षा! पहिल्यांदाच घडले असे
आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (१० मे) रायपूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स भिडले. या सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेच्या स्तर १ चे उल्लंघन केल्याप्रकरणी आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक ऍंडी फ्लॉवर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शिक्षा केली आहे. त्यांना त्यांच्या सामना शुल्काच्या १५% दंड ठोठावण्यात आला आहे.
या आयपीएल हंगामात आतापर्यंत केवळ खेळाडू किंवा संघांच्या कर्णधारांनाच दंड ठोठावण्यात आला होता. संघाच्या मुख्य प्रशिक्षकावर झालेली ही पहिलीच शिक्षा आहे. यामुळे नेमके फ्लॉवर यांनी काय केले, ज्यामुळे त्यांना शिक्षा झाली. फ्लॉवर हे पंचांसोबत वादात अडकले होते. आरसीबीच्या डावाच्या १८ व्या षटकादरम्यान फ्लॉवर यांचे चौथ्या पंचांसोबत जोरदार वाद झाला. याच शाब्दिक चकमकीमुळे त्यांना दंड ठोठावला आहे.
याबद्दल आयपीएलने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, फ्लॉवर यांनी आचारसंहितेच्या कलम २.३ चे उल्लंघन केले, जे सामन्यावेळी ऐकू येईल अशा अश्लील भाषेचा वापर करण्याशी संबंधित आहे. त्यांनी हा गुन्हा मान्य केला आहे.
कृणाल पांड्याबद्दलच्या सीमारेषेच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे हा वाद सुरू झाला होता. एएम गझनफरचा सामना करताना कृणालने १८ व्या षटकातील दुसरा चेंडू वाईड लॉंग-ऑनच्या दिशेने उंच शॉट मारला, तिथे नमन धीरने सीमारेषेजवळ तो चेंडू झेलला आणि सीमारेषा ओलांडताना चेंडू तिलक वर्माच्या दिशेने फेकला, मात्र तिलकने तो झेल पूर्ण केला नाही आणि त्या चेंडूवर षटकारचा इशारा दिला. तेव्हा नमनच्या शूजचा स्पर्श सीमारेषेच्या कुशनला झाल्याचा गैरसमज झाला होता, मात्र रिप्लेमध्ये तसे दिसले नाही. क्रॅम्प आल्याने कृणालने धाव घेतली नाही आणि शेवटी तो चेंडू निर्धाव राहिला.
फ्लॉवर यांच्या प्रशिक्षणाखाली आरसीबीने आयपीएल २०२६ मध्ये उत्तम कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांपैकी ७ सामने जिंकून संघ १४ पॉइंट्ससह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. आरसीबीचा नेट रनरेटही १.१०३ असा उत्तम आहें. यामुळे त्यांचे प्लेऑफ्समध्ये पोहोचणे जवळपास निश्चित झाले आहे.
या हंगामात आतापर्यंत कर्णधारांमध्ये ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे आणि शुबमन गिल यांचा समावेश आहे.
सामन्याचे म्हटले तर आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. एमआयने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १६६ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात आरसीबीकडून कृणालने सर्वाधिक ७३ (४६) धावा केल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात आरसीबीने २ विकेट्सने विजय मिळवला.
Comments are closed.