भुवनेश्वर कुमार इतिहास रचणार? IPL 2026 मध्ये अशी कामगिरी करणारा ठरू शकतो पहिला वेगवान गोलंदाज
टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आयपीएल IPL 2026 च्या पहिल्याच सामन्यात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या भुवनेश्वरला 200 विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी आता केवळ 2 विकेट्सची आवश्यकता आहे. जर त्याने ही कामगिरी केली, तर आयपीएलमध्ये 200 बळी घेणारा तो जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरेल.
आतापर्यंत भुवनेश्वर कुमारने 190 सामन्यांमध्ये 198 विकेट्स घेतल्या आहेत. या प्रवासात त्याने दोनवेळा पाच गडी बाद करण्याची किमया साधली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आगामी सामन्यात सर्वांच्या नजरा ‘स्विंग किंग’ भुवीवर असतील. वेगवान गोलंदाजांच्या श्रेणीत त्याच्या आसपास सध्या कोणताही दुसरा गोलंदाज नाही, ज्यामुळे हा विक्रम त्याच्यासाठी अत्यंत खास असणार आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या लेग स्पिनर युझवेंद्र चहलच्या नावावर आहे. चहलने 174 सामन्यांत 221 विकेट्स घेतल्या असून, 200 हून अधिक विकेट्स घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. भुवनेश्वरने 2 विकेट्स घेताच तो या एलिट लिस्टमध्ये सामील होणारा दुसरा गोलंदाज आणि पहिला वेगवान गोलंदाज बनेल. या यादीत सुनील नरेन आणि पीयूष चावला प्रत्येकी 192 विकेट्ससह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
आयपीएलमधील टॉप-5 विकेट घेणारे गोलंदाज
- युझवेंद्र चहल: 221 विकेट्स (174 सामने)
- भुवनेश्वर कुमार: 198 विकेट्स (190 सामने)
- सुनील नरेन: 192 विकेट्स (189 सामने)
- पीयूष चावला: 192 विकेट्स (192 सामने)
- आर. अश्विन: 187 विकेट्स (221 सामने)
Comments are closed.