IPL 2026 – कूपर कोनोली एकटाच भिडला, गुजरातचा पराभव करत पंजाबचा विजयी श्री गणेशा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कूपर कोनोली याच्या शानदार आणि आक्रमक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने IPL 2026 मध्ये दमदार विजय नोंदवत विजयी श्रीगणेशा केला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 162 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबने हे आव्हान तीन विकेट राखून पार केले. प्रभस्मीरन सिंग याने 37 धावांची उपयुक्त खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली, मात्र मधल्या फळीत सतत विकेट्स पडत राहिल्याने सामना चुरशीचा बनला.

अखेर कूपर कॉनॉलीने जबाबदारी स्वीकारत 44 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावांची झंझावाती खेळी केली आणि गुजरातच्या तोंडचा घास पळवला. कर्णधार श्रेयस अय्यर याने 18 धावा केल्या, तर इतर फलंदाजांना मोठी कामगिरी करता आली नाही. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर रबाडा, राशिद खानवॉशिंग्टन सुंदर आणि अशोक शर्मा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

Comments are closed.