IPL 2026 लिलावापूर्वी फ्रँचायझींना मोठा धक्का! 5 परदेशी खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर होणार?

सध्या आयपीएल 2026 (Indian premier league 2026) च्या मिनी ऑक्शनसाठी सर्व 10 फ्रँचायझी तयारी करत आहेत. प्रत्येक संघ आपल्या टीमला मजबूत करण्यासाठी स्टार खेळाडूंना आपल्यासोबत जोडण्यास उत्सुक आहे. मात्र, मिनी ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूंवर बोली लावण्यापूर्वी फ्रँचायझींना खूप विचार करावा लागणार आहे.बीसीसीआयला 5 परदेशी खेळाडूंनी कळवले आहे की, ते संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध नसतील. अशा परिस्थितीत, या खेळाडूंवर मोठी बोली लावणे फ्रँचायझींसाठी तोट्याचा सौदा ठरू शकते.

मिनी ऑक्शनपूर्वी आलेल्या रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू जोश इंग्लिस (Josh English) संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध नसणार आहे. तो फक्त 20% सामन्यांमध्येच भाग घेऊ शकेल.
इतकंच नाही, तर न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ॲडम मिल्ने (Adam Milne) सुद्धा संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध नसेल. दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू रिले रुसो याचीही उपलब्धता अशीच राहणार आहे.

या यादीत ऑस्ट्रेलियाचे ॲश्टन एगर आणि विलियम सदरलँड यांची नावे देखील समाविष्ट आहेत. या सर्व खेळाडूंवर ऑक्शनमध्ये मोठी बोली लागण्याची शक्यता होती, पण आता त्यांच्या अपूर्ण उपलब्धतेमुळे फ्रँचायझींना नवीन रणनीती आखावी लागणार आहे.

Comments are closed.