संजू आणि आयुष सलामीवीर, पण एमएस धोनी…; राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नई प्लेइंग इलेव्हन
RR मॅच IPL 2026 साठी CSK प्लेइंग इलेव्हन : पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) आयपीएल 2026 साठी जोरदार तयारी सुरू केली आहे. 28 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 19व्या हंगामात सीएसकेचा पहिला सामना 30 मार्चला गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध होणार आहे. आयपीएल 2026 साठी चेन्नई सुपर किंग्सने आपल्या संघाला पूर्णपणे नवे रूप दिले आहे. मागील हंगामात तळाशी राहिल्यानंतर फ्रँचायझीने मोठे बदल करत युवा खेळाडूंवर मोठी गुंतवणूक केली आणि काही महत्त्वाचे ट्रेडही केले. त्यामुळे यंदा सीएसके एक तरुण आणि आक्रमक संघ म्हणून मैदानात उतरणार आहे. अनुभव आणि नव्या उर्जेचा संगम या संघात पाहायला मिळणार आहे.
तिकिटे थेट आहेत! 🎟️🔥
सुपर किंग्सचा कधीही न दिसणारा देखावा वाट पाहत आहे!22 मार्चची गर्जना करणारी रात्र चुकणार नाही याची खात्री करा!
तुमची तिकिटे CSK ॲप/वेबसाइट आणि जिल्हा ॲपवर मिळवा. 💛🥳
दुवा: https://t.co/89XEDCsltM#व्हिसलपोडू #Roar26 pic.twitter.com/Kj9IaBSpBI
— चेन्नई सुपर किंग्स (@ChennaiIPL) १५ मार्च २०२६
कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या(Ruturaj Gaikwad) नेतृत्वाखाली ‘यलो आर्मी’ मैदानात उतरणार असून अनुभवी एमएस धोनीची उपस्थिती संघासाठी मोठा आधार ठरणार आहे. या हंगामासाठी चेन्नईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन पाहिली तर फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत संतुलित संयोजन दिसत आहे.
संजू अन् आयुष सलामीवीर…
ओपनिंगची जबाबदारी संजू सॅमसन आणि युवा फलंदाज आयुष म्हात्रे यांच्यावर असू शकते. तर कर्णधार ऋतुराज गायकवाडसह डेवाल्ड ब्रेव्हिस आणि शिवम दुबे अशी ताकदवान तिकडी दिसू शकते. ब्रेविसची आक्रमक शैली आणि दुबेची पॉवर हिटिंग कोणत्याही गोलंदाजीवर भारी पडू शकते.
ऑलराउंडर आणि फिनिशरच्या भूमिकेत प्रशांत वीरसह अनुभवी एमएस धोनी विकेटकीपर म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळू शकतात. शेवटच्या षटकांमध्ये धोनीचा अनुभव संघासाठी अजूनही गेम चेंजर ठरू शकतो. त्याचबरोबर कार्तिक शर्मा किंवा सरफराज खान यांना देखील संधी मिळू शकते.
𝙎𝙬𝙞𝙩𝙘𝙝 𝙞𝙩. 𝙎𝙬𝙚𝙚𝙥 𝙞𝙩. 𝙎𝙘𝙤𝙤𝙥 𝙞𝙩. #व्हिसलपोडू #पिवळे pic.twitter.com/MnhOBdZgwk
— चेन्नई सुपर किंग्स (@ChennaiIPL) 14 मार्च 2026
गोलंदाजी विभागात अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू नूर अहमद मोठं शस्त्र ठरू शकतो. त्याला साथ देण्यासाठी वेगवान गोलंदाज नॅथन एलिस आणि मॅट हेन्री किंवा खलील अहमद यांच्यात स्पर्धा पाहायला मिळू शकते.
चेन्नई सुपर किंग्सची कशी असेल Playing XI- (CSK Playing XI IPL 2026)
संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, प्रशांत वीर, एमएस धोनी (फलंदाज), कार्तिक शर्मा/सरफराज खान, नूर अहमद, नॅथन एलिस, मॅट हेन्री/खलील अहमद.
चेन्नई सुपर किंग्ज पूर्ण संघ – (IPL 2026 CSK पूर्ण संघ)
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, एमएस धोनी, संजू सॅमसन, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुर्जपनीत सिंग, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, राष्ट्रीय प्रवीण चौधरी, वीरेंद्र चौधरी, वीरेंद्र चौधरी. ए.एस. कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेन्री, राहुल चहर, जॅक फॉल्क्स.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.