IPL 2026 – गुजरात एक्प्रेसपुढे केकेआरचे आव्हान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गुजरात टायटन्सचा वारू चांगला उधळला असून गेल्या पाचही सामन्यांत त्यांनी विजय मिळवले आहेत. पण गुजरातची ही विजयी घोडदौड रोखण्यासाठी केकेआरचा संघ सज्ज झाला आहे. आपल्या घरच्या मैदानात केकेआर गुजरातचा विजयरथ कसा रोखते, याची उत्सुकता सर्वांना असेल.

गुजरातच्या संघाने 12 सामने खेळले असून त्यामध्ये आठ विजय मिळवले आहेत, तर चार सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. गुजरातच्या खात्यात 16 गुण असून ते दुसऱया स्थानावर आहेत. केकेआरचे 11 सामने झाले आहेत, ज्यामध्ये त्यांनी चार विजय मिळवले असून सहा पराभव पत्करले आहेत. एका सामन्याचा निकाल लागू न शकल्याने त्यांचे 9 गुण आहेत. त्यामुळे उर्वरित तिन्ही सामने जिंकत त्यांचे 15 गुण होऊ शकतात.

गुजरातचे साई सुदर्शन, शुभमन गिल आणि जोस बटलर चांगली सुरुवात करत असून त्यांना वॉशिंग्टन सुंदर व जेसन होल्डरची चांगली साथ मिळत आहे. मोहम्मद सिराज आणि कॅगिसो रबाडा गोलंदाजीचे उत्तम सारथ्य करत आहेत.

केकेआरच्या फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगला समन्वय पाहायला मिळतो. अजिंक्य रहाणे, अंगक्रिश रघुवंशी, फिन ऍलन चांगल्या लयीत दिसत आहेत. रिंकू सिंग गेल्या सामन्यात चांगल्या फॉर्मात आला आहे. गोलंदाजीत सुनील नरिनसारखा हुकमी एक्का त्यांच्याकडे आहे.

Comments are closed.