IPL 2026: आयपीएलचे सामने टीव्ही आणि मोबाईलवर लाईव्ह कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती

आयपीएल 2026 चा पहिला सामना 28 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. पहिल्याच दिवशी सनरायझर्स हैदराबाद आणि (SRH vs RCB) आरसीबी हे दोन संघ आमनेसामने येतील. सामन्याला आता जास्त वेळ उरलेला नाही, त्यामुळे हा थरार तुम्ही टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहू शकता.

2025 च्या आयपीएल फायनलमध्ये आरसीबीने पंजाब किंग्सचा पराभव करून पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरले होते. त्यामुळेच यंदाचा पहिला सामना ‘डिफेंडिंग चॅम्पियन’ आरसीबी खेळणार आहे. हा सामना आरसीबीच्या घरच्या मैदानावर म्हणजेच बेंगळुरूमध्ये होणार आहे, जिथे त्यांना चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळेल.

जर तुम्हाला टीव्हीवर सामने पाहायचे असतील, तर तुम्हाला स्टार स्पोर्ट्स (Star Sports) चॅनेलवर पहावे लागेल. तसेच मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी तुम्ही जिओ हॉटस्टार (JioStar) ॲपचा वापर करू शकता. दरवेळेप्रमाणे यंदाही तुम्हाला तुमच्या आवडीच्या भाषेत कमेंट्री ऐकता येईल. हिंदी आणि इंग्रजीसोबतच इतर प्रादेशिक भाषांमध्येही ही सुविधा उपलब्ध असेल.

स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टार व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आयपीएलचे अधिकृत प्रक्षेपण केले जाणार नाही. मात्र, जर तुम्हाला सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहायचा असेल किंवा प्रत्येक चेंडूची मराठी, हिंदी अपडेट्स हवी असतील, तर तुम्ही इंडिया टीव्ही (India TV) वर सर्व ताज्या बातम्या आणि गुणतालिका (Points Table) पाहू शकता. यामुळे तुम्ही प्रत्येक अपडेटशी जोडलेले राहाल.

Comments are closed.