7 षटकार आणि 2 चौकार, 27 बॉलमध्ये 54 धावा, मुकुल चौधरीच्या वादळी खेळीनं लखनौनं केकेआरला हरवलं
IPL 2026 KKR वि LSG पूर्ण हायलाइट्स : लखनौ सुपरजायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज अटीतटीची लढत झाली. यामध्ये लखनौ सुपरजायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा 3 गडी राखून पराभ केला आहे. या सामन्यात मुकुल चौधरीने वादळी खेळी करत लखनौला विजय मिळवून दिला आहे. मुकूल चौधरीनं चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. लखनौसाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुकूल चौधरीनं 27 बॉलमध्ये 54 धावा करत लखनौला विजय मिळवून दिला. लखनौ आणि केकेआर या सामन्याचा निकाल देखील शेवटच्या बॉलवर लागला. मुकूल चौधरीनं 2 चौकार आणि 7 षटकार मारत विजय मिळवून दिला.
लखनौ सुपरजायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सला 3 गडी राखून पराभूत केले. मुकुल चौधरीने एकहाती सामन्याचे चित्र पालटून लखनौचा विजय निश्चित केला. ईडन गार्डन्सवर प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 181 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, एलएसजीकडून खेळणाऱ्या मुकुल चौधरीने शेवटच्या चेंडूवर एक धाव काढून आपल्या संघाचा विजय निश्चित केला. लखनौच्या संघानं मुकुलला 2.60 कोटींना खरेदी केलं होतं.
मुकुल चौधरीने केवळ 27 चेंडूंमध्ये 54 धावांची नाबाद खेळी केली
लखनौ सुपर जायंट्ससाठी, 21 वर्षीय मुकुल चौधरीने मोठी कामगिरी केली आहे. 182 धावांचा पाठलाग करताना, लखनौने 16 षटकांत 128 धावांत सात गडी गमावले होते. सामना पूर्णपणे केकेआरच्या नियंत्रणात होता. पण मुकुल चौधरीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. प्रत्येक षटकात चौकार आणि षटकार मारून तो सामना विजयाच्या जवळ नेत होता. शेवटच्या दोन षटकांत 30 धावा शिल्लक असताना, मुकुलने 19 व्या षटकात 16 धावा केल्या. शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती. आवेशने एक धाव दिली आणि मुकुलने षटकार मारला. त्यानंतर दोन निर्धाव चेंडू पडले. आता दोन चेंडूंमध्ये सात धावांची गरज होती. मुकुलने षटकार मारला. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने लखनौला सामना हरवला. मुकुल चौधरीने केवळ 27 चेंडूंमध्ये 54 धावांची नाबाद खेळी करून सामना जिंकून दिला.
माझ्या मुलानं क्रिकेटर व्हावं हे वडिलांचं स्वप्न होतं
माझ्या वडिलांचं लग्न झालं नव्हतं तेव्हा त्यांचं स्वप्न होतं, मला मुलगा झाला तर त्यानं क्रिकेटर व्हावं. वडिलांना माझ्या उत्तर प्रदेश विरोधातील मॅचमध्ये केलेल्या कामगिरीमुळं मी क्रिकेटमध्ये काही तरी करेन असं वाटलं होतं असे मुकूल चौधरीने म्हटले. शेवटपर्यंत खेळायचं हे माहिती होतं, शेवटपर्यंत खेळल्यास मॅच जिंकू असं वाटलं होतं असेही चौधरीने सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.