सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध मैदानात उतरताच कॅप्टन रहाणेचा विक्रम! आयपीएलच्या इतिहासात 'अशी' कामगिरी करणारा ठरला 11 वा खेळाडू
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) २०२६ च्या हंगामात आज (२ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात सहावा सामना खेळला जात आहे. ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या या सामन्यात कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने मैदानावर पाऊस ठेवताच खास विक्रम आपल्या नावे केला आहे. तो आयपीएलमध्ये २०० सामने खेळणारा ११ वा खेळाडू ठरला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत २७८ सामने खेळले आहेत, त्याच्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा क्रमांक लागतो. रोहितने २७३ आणि विराटने २६९ सामने खेळले आहेत. या यादीत पहिल्या दहामध्ये भारतीय खेळांडूचाच समावेश आहे. या यादीत चौथ्या स्थानावर दिनेश कार्तिक आहे. त्याने २५७ आयपीएल सामने खेळले आहेत.
रहाणेने आयपीएलमध्ये कोलकाता, चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या सहा वेगवेगळ्या संघाकडून खेळला आहे. त्यामध्ये त्याने ३०.७२ च्या सरासरीने आणि १२५.४४ च्या स्ट्राईक रेटने ५०९९ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये सर्वोत्तम काळ राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असताना आणि चेन्नईकडून खेळत असतानाचा आहे.
आयपीएलमध्ये २०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळलेले खेळाडू
एमएस धोनी – 278 समोर
रोहित शर्मा – 273 समोर
विराट कोहली – 268 समोर
दिनेश कार्तिक – २५७ समोर
रवींद्र जडेजा – 255 समोर
शिखर धवन – 222 समोर
रविचंद्रन अश्विन – 221 समोर
सुरेश रैना – २०५ समोर
रॉबिन उथप्पा – २०५ समोर
अंबाती रायुडू – २०४ समोर
अजिंक्य रहाणे – 200 समोर
Comments are closed.