IPL 2026 – केकेआरची जिवाची मुंबई, कोलकाता विजयासह 13 गुणांवर पोहोचली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आपले प्ले ऑफचे आव्हान कायम ठेवले आहे. मुंबईला 4 विकेट्सने पराभूत करत केकेआर आता 13 गुणांवर पोहोचली आहे. मनीष पांडे आणि रोवमन पॉवेल यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे केकेआरला मुंबईच्या 148 धावांचा लीलया पाठलाग करता आला.

मुंबईला रायल रिक्लेटनच्या रूपात पहिला धक्का बसला. तो 7 धावा करू शकला. रोहित शर्माला 15 धावांवर समाधान मानावे लागले, तर नमन धीरहा भोपळाही पह्डता आला नाही. त्यामुळे मुंबईची 3 बाद 23 अशी अवस्था झाली होती. यावेळी सूर्यपुमार यादवला मोठी खेळी साकारण्याची सुवर्णसंधी होती, पण तो पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि फक्त 15 धावा करू शकला. तिलक वर्माने यावेळी 20 धावा करण्यासाठी 32 चेंडू खर्च केले. हार्दिक पंडय़ानेही वन डे स्टाईलमध्ये 26 धावा केल्या आणि मुंबईची 6 बाद 95 अशी स्थिती झाली होती. यावेळी बॉशने संघाला मार्ग दाखवला.

बॉशने अखेरच्या षटकात कार्तिक त्यागीचा चांगलाच समाचार घेतला. धडाकेबाज फटकेबाजी करत बॉशने 18 चेंडूंत 3 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 32 धावा साकारल्या आणि त्यामुळेच मुंबईला 147 धावांपर्यंत मजल मारता आली.

Comments are closed.