IPL 2026 – संघहितासाठी हार्दिकने कर्णधारपदाचा मोह सोडून सूर्याला संधी द्यावी; माजी खेळाडूचा पंड्याला सल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयपीएलच्या गेल्या पाच हंगामात मुंबई इंडियन्सला एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानचे माजी खेळाडू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी मुंबईच्या नेतृत्वात बदलाचे संकेत दिले आहेत. श्रीकांत यांच्या मते, आता मुंबई इंडियन्सच्या कप्तानीची धुरा हिंदुस्थानचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवण्याची वेळ आली आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना त्यांनी ही परिस्थिती ‘विचित्र’ असल्याचे सांगत, मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली आहे.

श्रीकांत म्हणाले की, हार्दिक पंड्या हा एक चांगला कर्णधार आहे, यात शंका नाही. त्याने गुजरात टायटन्सला पहिल्याच हंगामात जेतेपद मिळवून दिले असून 60 पैकी 35 सामने जिंकण्याचा त्याचा विक्रमही उत्कृष्ट आहे. मात्र, सध्याच्या मुंबईच्या संघात अशी परिस्थिती आहे की, हार्दिकच्या नेतृत्वाखाली दोन असे खेळाडू खेळत आहेत ज्यांच्या नेतृत्वात भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. अशा वेळी हार्दिकने स्वतः पुढाकार घेऊन हा पेच सोडवला पाहिजे, असे श्रीकांत यांना वाटते. “बाहेरून पाहताना सूर्यकुमार यादव हा कर्णधारपदासाठी सर्वात योग्य पर्याय वाटतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

IPL 2026 – काही गोष्टी कधीच संपत नाहीत; दिल्ली कॅपिटल्समध्ये परतल्यानंतर पृथ्वी शॉ भावूक, म्हणाला…

श्रीकांत यांनी सुचवले की, जर हार्दिकने स्वतः मॅनेजमेंटला जाऊन सांगितले की, “सूर्याला कप्तानी करू द्या, मी त्याला पूर्ण पाठिंबा देईन,” तर हा वाद कायमचा मिटू शकतो. सूर्यकुमारने आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही संघाचे पूर्णवेळ नेतृत्व केलेले नाही, मात्र टीम इंडियासाठी त्याची कामगिरी प्रभावी राहिली आहे. विशेष म्हणजे रोहित आणि सूर्याच्या कप्तानीखाली खेळताना हार्दिकने टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता संघहितासाठी हार्दिकने कप्तानीचा मोह सोडून सूर्याला संधी द्यावी, असा सल्ला श्रीकांत यांनी दिला आहे.

Comments are closed.