IPL 2026 – आयपीएल 28 मार्चपासून; अंतिम सामना 31 मे रोजी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयपीएलच्या नव्या हंगामीची सुरुवात आता 28 मार्चपासून होणार आहे. मूळ नियोजनानुसार 26 मार्चला स्पर्धा सुरू होणार होती; मात्र अंतर्गत निर्णयानंतर प्रारंभाची तारीख दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. अंतिम सामना 31 मे रोजी खेळवला जाईल.

आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू येथील विधानसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात विलंब झाला आहे. कोलकाता आणि चेन्नई ही अनुक्रमे कोलकाता नाईट रायडर्स व चेन्नई सुपर किंग्सची गृहमैदाने आहेत तर गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्सचे दुसरे मैदान आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमानुसार वेळापत्रक दोन टप्प्यांत जाहीर करायचे की एकदाच, यावर आयपीएलची पुढील आठवडय़ात बैठक होणार आहे. दरम्यान, उद्घाटन सामना पुठे खेळवायचा यावरही चर्चा रंगणार आहे. विजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्या सामन्यात उतरणार असले, तरी चिन्नास्वामीवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर त्यांच्या घरच्या सामन्यांचे ठिकाण बदलायचे का, याबाबत विचार सुरू आहे.

Comments are closed.