IPL 2026 – वानखेडेवर आशाताई यांना मानवंदना; एक मिनिटांचे मौन, दंडावर काळी फित बांधून खेळाडू मैदानात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानच्या दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली असून मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करत एक मिनिट मौन पाळले. मैदानावरील हा क्षण अत्यंत भावनिक होता आणि प्रेक्षकही स्तब्ध झाले होते. याशिवाय, दोन्ही संघांच्या खेळाडूंनी दंडावर काळी फित बांधून आशाताई यांना मानवंदना दिली. तसेच वानखेडेवर संपूर्ण लढतीवेळ आशा भोसले यांची गाणी वाजवण्यात आली..

आशा भोसले यांनी तब्बल सात दशकांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गात हिंदुस्थानी संगीताला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली. त्यांच्या आवाजातील विविधता आणि अभिव्यक्तीमुळे त्या पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनात घर करून राहिल्या. त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत क्रीडा विश्वातूनही त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

Comments are closed.