IPL 2026 – नागपूर, पंजाब व्हाया MI! तरुण तडफदार पठ्ठ्यांची मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वर्णी; मैदान गाजवण्यासाठी सज्ज

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मध्ये गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना खेळला जात आहे. गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं असून मुंबईच्या ताफ्यात दोन युवा खेळाडूंचे पदार्पण झाले आहे.

दुखापतीमुळे रोहित शर्माच्या खेळण्यावर अजूनही प्रश्चचिन्ह आहे. त्यामुळे डी कॉक सोबत सलामीला कोण येणार हा मोठा प्रश्न मुंबई समोर होता. मात्र, मुंबईने या सामन्यात आपले दोन तरुण तडपदार खेळाडू मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीवीर दानिश मालेवार आणि मध्यमती गोलंदाज क्रिश भगत यांचे या सामन्यात IPL मध्ये पदार्पण झाले आहे. दानिश मालेवार नागपूरचा खेळाडू असून संघाला त्याच्याकडून दमदार फलंदाजीची अपेक्षा असणार आहे. तर गोलंदाजीमध्ये क्रिश भगतकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. आता हे दोन्ही खेळाडू आपल्या पहिल्याच सामन्यात कशी कामगिरी करतात, हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

Comments are closed.