IPL 2026 – मुंबईच्या संघात अल्लाहला स्थान, एकही सामना न खेळता आयपीएल जिंकलेला हा खेळाडू आहे तरी कोण?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयपीएल 2026 च्या हंगामातील मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्यात एका नव्या खेळाडूची चर्चा रंगली आहे. अफगाणिस्तानचा 20 वर्षीय युवा फिरकीपटू अल्लाह मोहम्मद गझनफर याने आज मुंबई इंडियन्ससाठी आपले आयपीएल पदार्पण केले. विशेष म्हणजे, ज्या केकेआर संघाविरुद्ध तो आज खेळत आहे, त्याच संघाचा तो गेल्या हंगामात भाग होता.

कोण आहे अल्लाह गझनफर?
20 मार्च 2006 रोजी अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतात जन्मलेला गझनफर हा एक उजव्या हाताचा ऑफ-स्पिनर आहे. 6 फूट 2 इंच उंची असलेल्या या गोलंदाजाची तुलना अफगाणिस्तानचाच दिग्गज फिरकीपटू मुजीब उर रहमानशी केली जाते. सुरुवातीला वेगवान गोलंदाज असलेल्या गझनफरने माजी क्रिकेटपटू दौलत अहमदझाई यांच्या सल्ल्यानुसार फिरकी गोलंदाजीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्याने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
केकेआरसोबतचे जुने नाते आणि मुंबईची मोठी बोली अल्लाह गझनफर 2024 च्या हंगामात केकेआर संघात बदली खेळाडू म्हणून सामील झाला होता. त्या वर्षी केकेआरने विजेतेपद पटकावले, त्यामुळे गझनफरने एकही सामना न खेळता आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळवला होता. मात्र, 2025 च्या मेगा लिलावात त्याच्यासाठी मुंबई इंडियन्स, केकेआर आणि आरसीबी यांच्यात चुरस पाहायला मिळाली. अखेर मुंबई इंडियन्सने 75 लाखांच्या मूळ किमतीवरून तब्बल 4.80 कोटी रुपये मोजून त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.

2024 च्या अंडर-19 विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध 29 धावांत 3 बळी घेत त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता मुंबई इंडियन्सच्या निळ्या जर्सीमध्ये हा ‘मिस्ट्री स्पिनर’ आपली जादू कशी दाखवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.