10 संघ,13 ठिकाणे अन् 70 साखळी सामने! आजपासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाचा थरार सुरू, 2026 मध्ये नवीन काय?

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम आजपासून (२८ मार्च) सुरू होत आहे. यामधील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद असा रंगणार आहे. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३१ मार्चला खेळला जाणार आहे. यादरम्यान १० संघांमध्ये एकूण ७० साखळी सामने खेळले जाणार आहेत. अद्याप प्लेऑफच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.

या हंगामात काही संघ नव्या स्टेडियमचा होम ग्राऊंड म्हणून उपयोग करणार आहे. यामध्ये आरसीबी आपले दोन घरचे सामने रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग स्टेडियममध्ये खेळणार, दुसरीकडे पंजाब किंग्ज चार सामने न्यू चंदीगड आणि तीन सामने धरमशालामध्ये खेळणार आहेत. तसेच राजस्थान रॉयल्स चार सामने जयपूर आणि तीन सामने गुवाहाटीमध्ये खेळणार आहेत.

दहा संघाचे यंदा पाच-पाच असे दोन ग्रुप करण्यात आले आहेत. पहिल्या ग्रुप ए मध्ये चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आहेत. ग्रुप बी मध्ये मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैद्राबाद, गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स असा आहे. यामध्ये संध आपल्या ग्रुपमधील संघांसोबत एक आणि दुसऱ्या ग्रुपसोबत दोन सामने खेळणार आहेत. संध्याकाळचे सामने ७.३० वाजता आणि दुपारचे सामने ३.३० सुरू होणार आहेत.

या हंगामासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काही नवे नियम आणले आहेत.
१. कोणत्याही संघाला सामन्याच्या दिवशी सराव करण्याची परवानगी नाही.
२. कोणत्याही संघाला दोनपेक्षा अधिक सराव करण्याची परवानगी नाही.
३. कोणताही संघ नेट्स शेयर करणारी नाही, प्रत्येक संघाला सरावासाठी वेगवेगळ्या नेट्स दिल्या जातील.
४. यजमान संघ ज्या मैदानावर आपला पहिला सामना खेळणार आहे, त्या मैदानावर सामन्याच्या ४ दिवसाआधी प्रशिक्षण किंवा सरावाला परवानगी नाही.
५. खेळाडू त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसोबत प्रवास करण्याची परवानगी नाही. त्या खेळाडूंना सरावासाठी किंवा सामन्यासाठी संघाच्या बसनेच प्रवास करावा लागणार.
६. बीसीसीआयने आयपीएल सामन्याच्या वेळी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला मैदानावारील एलईबी बोर्डाजवळ बसण्यास बंदी घातली आहे.

Comments are closed.