IPL 2026: अय्यर-गिल यांच्यात आज लढत; मुल्लानपूरची खेळपट्टी आणि हवामानाचा अंदाज घ्या जाणून
भारतीय टी२० संघाच्या बाहेर असलेले शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या आज (३१ मार्च) आयपीएल २०२६ हंगामाची सुरूवात होत आहे. मागील हंगामाचा उपविजेता पंजाब किंग्ज आणि २०२२ चा विजेता गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल १९ व्या हंगामाचा चौथा सामना खेळला जाणार आहे. हा सामना न्यू चंडीगडमधील मुल्लानपूरच्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. येथे खूपच कमी सामने खेळले गेले आहेत, तर जाणून घेऊ खेळपट्टीचा आणि हवामानाचा अंदाज.
या स्टेडियमवर आतापर्यंत ११ आयपीएल सामने खेळले गेले. त्यापैकी सहा सामने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत, तर ५ सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले. या मैदानावार आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या २२८ आहे, तर सर्वात कमी धावसंख्या ९५ आहे. येथिल पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १६९ आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सामना खेळपट्टी क्रमांक ४ वर खेळला जाणार आहे. गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबने आर्याच्या शतकी खेळीच्या जोरावर २१९ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात चेन्नईने २०१ धावा केल्या होत्या. त्यामुळे आजचा सामानाही मोठ्या धावसंख्येचा होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन हंगामात अय्यरने संघांचे नेतृत्व करताना त्यांना अंतिम फेरीत पोहोचवले आणि एका संघासोबत विजेतेपदही पटकावले. दुसरीकडे गिल २०२० च्या हंगामापासून आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने मागील वर्षी गुजरातचे नेतृत्व करताना संघाला बाद फेरीपर्यंत नेले होते. आयपीएल २०२५ मध्ये अय्यरने १७५च्या स्ट्राईक रेटने ६०४ धावा केल्या. गिलने १५५.८७ च्या स्ट्राईक रेटने ६५० धावा केल्या. त्यानंतर मात्र दोघेही टी२० क्रिकेटपासून दूर राहिले.
अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांचा टी२० फॉर्म आणि टी२० संघात पुनरागमन केलेला ईशान किशन यांच्यामुळे तसेच खराब फॉर्ममुळे गिल भारताच्या टी२० संघातून बाहेर झाला. अय्यरनेही २०२५ च्या आयपीएलनंतर एकही टी२० सामने खेळलेला नाही. दोघांच्या नेतृत्वात पंजाब आणि गुजरात कशी सुरूवात करेल, याकडे लक्ष असणार आहे.
मुल्लनपूरचे हवामान दिवसा ढगाळ असणार आहे, मात्र सामन्याची वेळ रात्री ७.३० असल्याने तेव्हा पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे संपूर्ण षटकांचा सामना अपेक्षित आहे.
पंजाब आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत एकूण ६ आयपीएल सामने खेळले गेले. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी ३-३ सामने जिंकले आहेत. यावरून दोन्ही संघांमध्ये अटीतटीचे सामने झालेले आहेत.
पंजाब किंग्ज संभाव्य अकरा प्लेइंग – प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कीपर),
कूपर कोनोली, मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, मार्को जॅनसेन, शशांक सिंग, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
इम्पॅक्ट प्लेयर – विजयकुमार वैशाक
गुजरात टायटन्सचा संभाव्य प्लेइंग इलेवन – शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवातिया, जेसन होल्डर, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
इम्पॅक्ट प्लेयर – कगिसो रबाडा किंवा आर साई किशोर
Comments are closed.