पहिल्याच सामन्यात कोहलीचा विराट रेकॉर्ड, आयपीएलच्या इतिहासात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगामाला शनिवारी (२८ मार्च) सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) सनरायझर्स हैद्राबादला (एसआरएच) पराभवाचा धक्का दिला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान आरसीबीने २०२ धावसंख्येचे लक्ष्य १५.४ षटकातच पार करत सामना ६ विकेट्सने जिंकला. या सामन्यात आरसीबीची स्टार फलंदाज विराट कोहली याने स्फोटक खेळी केली आणि इतिहास रचला आहे.
विराट जेव्हा-जेव्हा मोठ्या खेळी करतो तेव्हा-तेव्हा त्याच्या नावावर विक्रम रचले जातात. शनिवारच्या सामन्यातही तसेच झाले. त्याने सलामीला येताना लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद ६९ धावा केल्या. त्याने ३८ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकार मारत ही खेळी केली. तो आयपीएलच्या इतिहासात धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याचबरोबर तो दुसऱ्या डावात किंवा लक्ष्याचा पाठलाग करताना ४००० धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
या विक्रमाबरोबर विराटने पाकिस्तानचा माजी फलंदाज शोएब मलिक याला मागे टाकत टी२० मध्ये सहावा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज करण्याचा विक्रम केला. शोएबने ५५७ टी२० सामन्यांमध्ये १३५७१ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ८३ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने ४१५ सामन्यांत १३६१२ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १०६ अर्धशतक आणि ९ शतकांचा समावेश आहे.
आयपीएल २०२६ च्या पहिल्या सामन्यामध्ये आरसीबीने नाणेफेक जिंकत एसआरएचला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. त्यांनी पॉवरप्लेमध्ये लवकरच विकेट गमावल्या, मात्र कर्णधार ईशान किशनने संघाचा डाव सांभाळला आणि २०० धावसंख्येचा टप्पा गाठला. त्याने ३८ चेंडूत ८ चौकार आणि पाच षटकारांसह ८० धावा केल्या. अंकित वर्मा याने १८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४३ धावा केल्या.
आरसीबीची गोलंदाजी पाहिली तर जेकब डफी याने पहिल्याच सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. त्याने २२ धावा दत ३ विकेट्स घेतल्या. तसेच रोमारियो शेफर्डने ३ विकेट्स (५४ धावा) घेतल्या. भुवनेश्वर कुमार (३१ धावा), अभिनंदन सिंग आणि सुयश शर्मा यांनाही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना विराटबरोबर इम्पॅक्ट प्लेयर देवदत्त पड्डीकलनेही २६ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ६१ धावा केल्या. कर्णधार रजत पाटीदारने १२ चेंडूत ३१ धावा केल्या. यामध्ये त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले.
Comments are closed.