आयपीएलआधी रिंकू सिंगला मिळणार खास गिफ्ट, उत्तर प्रदेशचा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती!

आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू रिंकू सिंग याची उत्तर प्रदेश सरकारकडून क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. भारतीय क्रिकेट संघासोबत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत रिंकूला हा सन्मान दिला जात आहे. काही रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी (२४ मार्च) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊ येथील लोक भवनात रिंकूची प्रादेशिक क्रीडा अधिकारी (RSO) म्हणून नियुक्ती होणार आहे.

रिंकूबरोबरच इतर आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही सन्मान केला जाणार असून अनेकांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा सदस्य राजकुमार पाल याला डीएसपी बनवण्यात येणार आहे. राज्यातील सहा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.

रिंकू आणि राजकुमार यांच्या व्यतिरिक्त पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीमध्ये सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकीत रौप्यपदक जिंकणारा अजित सिंग, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये २०० मीटर शर्यतीत कांस्यपदक विजेती सिमरन, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये १०० आणि २०० मीटर शर्यतीत कांस्यपदक विजेता प्रीतिपाल यांना गटविकास अधिकारी पदांचे नियुक्तीपत्रे देण्यात येतील.

लक्ष्मण पुरस्कार (सर्वसाधारण श्रेणी) विजेते-
उत्तम सिंग (गाझीपूर) – हॉकी
अभिजीत कुमार (प्रयागराज) – जिम्नॅस्टिक्स
विनय (वाराणसी) – पॅरा पॉवरलिफ्टिंग
विक्रांत बालियन (मेरठ) – कुस्ती
सागर डांगी (बागपत)- शूटिंग

राणी लक्ष्मीबाई पुरस्कार (सर्वसाधारण श्रेणी) विजेते-
भानू पाठक (गोरखपूर) – पर्वतारोहण
दीपक कुमार (गाझियाबाद) – गिर्यारोहण
तान्या चौधरी (सहारनपूर) – ऍथलेटिक्स
तनुश्री पांडे (लखनौ) – सॉफ्ट टेनिस
ओम यादव – सॉफ्ट टेनिस
राजकुमार पाल (गाझीपूर) – हॉकी
यश कुमार (आग्रा) – पॅरा कॅनोइंग
मुस्कान यादव (प्रयागराज) – सॉफ्ट टेनिस
अभय सिंग (वाराणसी) – कयाकिंग आणि कॅनोइंग

राणी लक्ष्मीबाई पुरस्कार (पॅरा श्रेणी)-
प्रमुख नावांमध्ये श्रवण कुमार (बागपत), यश तोमर (बागपत) आणि इशान खान (बागपत) यांचा समावेश आहे.

Comments are closed.