27 कोटी घेणारा ऋषभ पंत सर्वात महागडा फलंदाज आणि कर्णधार; पाहा कोण आहे सर्वाधिक मानधन घेणारा गोलंदाज?

28 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) या सामन्याने आयपीएल 2026 ची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह अनेक देशांतील दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील. आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये कॅमरन ग्रीन (Camron Green) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला असून, त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 25.20 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र, तरीही तो या सीझनमधील सर्वात महागडा खेळाडू नसेल.

ऋषभ पंत (Rishbh pant) हा अजूनही आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 27 कोटी रुपयांना खरेदी केले होते. तो केवळ आयपीएल 2026 मधील सर्वात महागडा फलंदाजच नाही, तर सर्वात महागडा कर्णधार देखील आहे. गेल्या सीझनमध्ये लखनऊचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर होता, त्यामुळे यावेळी पंतच्या नेतृत्वाखाली संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

गोलंदाजी करू शकणाऱ्या खेळाडूंचा विचार केला तर आयपीएल 2026 मध्ये कॅमरन ग्रीन हा सर्वात महागडा खेळाडू आहे, ज्याला केकेआरकडून 25.20 कोटी रुपये मानधन मिळेल. मात्र, ग्रीन हा प्रामुख्याने फलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. जर गोलंदाजाचा विचार केला, तर आयपीएल 2026 मध्ये अर्शदीप सिंग (Arshdeep singh) हा सर्वात महागडा गोलंदाज ठरेल. त्याला पंजाब किंग्सकडून 18 कोटी रुपये मानधन मिळणार आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला (Pat Cummins) देखील या सीझनसाठी एवढीच रक्कम मिळणार आहे.

भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली हे देखील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीला 2026 च्या सीझनसाठी 21 कोटी रुपये मानधन मिळणार आहे. तर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला 16.30 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते.

Comments are closed.