IPL 2025 – जडेजाची ‘घरवापसी’, तर संजूने घातली पिवळी जर्सी; एका रात्री 10 खेळाडूंची अदलाबदल

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेड शुक्रवारी पार पडली. चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचा आपल्या ताफ्यात समावेश करून घेतले आहे. संजूच्या बदल्यामध्ये चेन्नईने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा खेळाडू सॅम करन याला राजस्थानकडे सोपवले आहे. अर्थात या ट्रेडमुळे जडेजाचे नुकसान झाले आहे. चेन्नईने जडेजाला 18 कोटी रुपयांमध्ये घेतले होते, मात्र राजस्थानने त्यासाठी फक्त 14 कोटी मोजले आहेत.

Comments are closed.