आयपीएल 2026 चे वेळापत्रक जाहीर! बीसीसीआयने केवळ 20 सामन्यांचे टाईमटेबल केलं जाहीर, पहिली लढत आरसीबी विरुद्ध…

आयपीएल २०२६चे वेळापत्रक अखेर बुधवारी (११ मार्च) जाहीर झाले आहे. आधी ठरल्याप्रमाणे पहिला आणि अंतिम सामना (३१ मे) बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यामध्ये पहिला सामना २८ मार्चला गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद असा खेळला जाणार आहे.

काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे आयपीएल २०२६चे वेळापत्रक जाहीर होण्यास उशिर झाला होता. त्यामुळे चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. या स्पर्धेतील दुसरा सामना २९ मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. त्याचबरोबर सर्वाधिक चाहत्यांना ज्या सामन्यांची प्रतिक्षा असते ते सामने म्हणजे आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना ५ एप्रिलला बेंगलोर आणि आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना १२ एप्रिलला मुंबईमध्ये खेळला जाणार आहे.

नवीन हंगाम २८ मार्च रोजी सुरू होणार आहे, ज्यामुळे फ्रँचायझींच्या कामगिरीवर पुन्हा लक्ष केंद्रित होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) स्पर्धेची पुढील सामने टप्प्याटप्प्याने जाहीर करणार आहेत.

आयपीएल २०२६मध्ये सीएसके सामने ३० मार्चला गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध, ३ एप्रिलला चेन्नईमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध, ५ एप्रिलला बेंगलोरमध्ये आरसीबी विरुद्ध आणि ११ एप्रिलला चेन्नईमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध असे खेळले जाणार आहेत.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.