ईशान किशन कॅप्टन बनताच आयपीएलमध्ये घडला इतिहास, पहिल्यांदाच 10 संघांच्या बाबतीत ‘असा’ योगायोग

पॅट कमिन्सच्या दुखापतीमुळे सनरायझर्स हैद्राबादने ईशान किशनला आपला तात्पुरता कर्णधार म्हणून निवडले आहे. कमिन्स आयपीएल २०२६ हंगामाच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे, त्यामुळे हैद्राबादच्या नेतृत्वामध्ये बदल झाला आहे. ईशान संघाचा कर्णधार, तर अभिषेक शर्मा उपकर्णधार बनला आहे. ईशान कर्णधार झाल्याने आयपीएलमध्ये एक योगायोग घडला आहे, असे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच झाले आहे.
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच १० संघाचे कर्णधार भारतीय असणार आहेत. हे स्पर्धेच्या इतिहासात याआधी कधीही घडले नाही. मागील दोन हंगांमामध्ये २०२४ मध्ये फाफ डु प्लेसिसने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे आणि कमिन्सने हैद्राबादचे नेतृत्व केले आहे. हे दोघेही परदेशी खेळाडू आहेत. तसेच २०२५ मध्ये कमिन्स एकमेव परदेशी कर्णधार होता. २०२६च्या सुरूवातीच्या काही सामन्यांना तो मुकणार असल्याने कर्णधारांच्या फोटोशूटमध्ये १० भारतीय कर्णधार दिसणार आहेत.
आयपीएलमध्ये चेन्नई वगळता प्रत्येक फ्रॅंचायजीने कधी ना कधी विदेशी खेळाडूला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तसेच एमएस धोनीने सर्वाधिक काळ नेतृत्व केले आहे. त्याच्या अनुपस्थितीत चेन्नईचे नेतृत्व सुरेश रैना यानेही केले आहे. त्याचबरोबर रविंद्र जडेजालाही कर्णधार केले होते. आता ऋतुराज गायकवाड चेन्नईचे नेतृत्व करत आहे.
आयपीएल २०२६चे सर्व कर्णधार:
कोलकाता नाईट रायडर्स – अजिंक्य रहाणे, भारत, 37 वर्ष
रॉयल चॅलेंडर्स बेंगलोर – रजत पाटीदार, भारत, 32 वर्ष
मुंबई इंडियन्स – हार्दिक पांड्या, भारत, ३२ वर्षे
दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल, भारत, 32 वर्ष
पंजाब किंग्ज – श्रेयस अय्यर, भारत, 31 वर्ष
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, भारत, 29 वर्ष
लखनौ सुपर जायंट्स- ऋषभ पंत, भारत, 28 वर्षे
सनरायझर्स हैद्राबाद – ईशान किशन, भारत, 27 वर्ष
गुजरात टायटन्स – शुबमन गिल, भारत, 26 वर्ष
राजस्थान रॉयल्स – रियान पराग, भारत, २४ वर्षे
Comments are closed.