IPL 2026 – धोनीच्या नसण्याने ‘CSK’ला फारसा फरक पडणार नाही; हैदराबादच्या फलंदाजाचे मोठे वक्तव्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सनरायझर्स हैदराबादचा धडाकेबाज फलंदाज हेनरिक क्लासेनने IPL 2026 च्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्सबाबत (CSK) एक महत्त्वाचे विधान केले आहे. चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीने संघाला फारसा फरक पडणार नाही, असे मत त्याने व्यक्त केले आहे. क्लासेनच्या मते, चेन्नईचा संघ एका खेळाडूवर अवलंबून नसून त्यांची ताकद त्यांच्या सांघिक कामगिरीमध्ये आहे. जरी धोनी मैदानात नसला तरी चेन्नई हा एक अत्यंत बलाढ्य संघ आहे आणि त्यांना हरवणे सोपे नसेल, असेही त्याने नमूद केले.

धोनीच्या प्रभावाबद्दल जिओ स्टारशी बोलताना क्लासेन म्हणाला की, धोनीचा प्रभाव त्याच्या फलंदाजीपेक्षा नेतृत्वामध्ये अधिक होता. गेल्या काही वर्षांपासून धोनी केवळ 5 ते 10 चेंडू खेळण्यासाठी मैदानात येत होता, त्यामुळे त्याच्या नसण्याचा फलंदाजीवर मोठा परिणाम होणार नाही. मात्र, त्याच्या अनुभवी नेतृत्वाची उणीव नक्कीच भासू शकते. तरीही चेन्नईकडे सध्या दर्जेदार फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंची फळी असल्याने ते स्पर्धेत कायम तगडे आव्हान निर्माण करतील, असा विश्वास क्लासेनने व्यक्त केला.

IPL 2026 – टी20 वर्ल्ड कपमध्ये खोऱ्याने धावा काढणारा संजू सॅमसन अजूनही शांत का? प्रशिक्षकाने सांगितले कारण

दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादची (SRH) यंदाच्या हंगामात सुरुवात संमिश्र झाली आहे. पहिल्या तीन सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. सध्या कर्णधार पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत इशान किशन संघाचे नेतृत्व करत आहे. असे असले तरी, क्लासेनने आगामी सामन्यांसाठी आत्मविश्वास व्यक्त केला आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात शिवम दुबे आणि त्यांच्या सलामीवीरांवर दडपण आणण्याचे आमचे मुख्य लक्ष्य असेल, असे सांगत त्याने फिरकी गोलंदाजीवर आक्रमक खेळ सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

Comments are closed.