IPL 2026 – 18 कोटींचा हुकुमी एक्का लवकरच KKR च्या ताफ्यात सामिल होणार, चाहत्यांचा उत्साह शिगेला
कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 18 कोटींचा हुकुमी एक्का मथीशा पथिराना लवकरच IPL 2026 मध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. टी-20 विश्वचषकादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे पथिराना अद्याप हिंदुस्थानात येऊ शकलेला नाही, ज्याचा फटका केकेआरच्या गोलंदाजीला बसला आहे. संघाने आपले पहिले दोन सामने गमावले असून तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. मात्र, आता पथिराने नेटमध्ये गोलंदाजी सुरू केली असून तो वेगाने सावरत असल्याची सकारात्मक माहिती समोर आली आहे.
ESPNcricinfo च्या अहवालानुसार, पथिराना एप्रिलच्या मध्यापर्यंत हिंदुस्थानात दाखल होऊ शकतो. श्रीलंका क्रिकेट बोर्ड पुढील आठवड्यात त्याची फिटनेस चाचणी घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, श्रीलंका क्रिकेटने पथिराना आणि वानिंदू हसरंगा यांना अद्याप फिटनेस चाचणी दिलेली नसतानाही केंद्रीय करारात स्थान दिले आहे. पथिरानाच्या आगमनामुळे केकेआरच्या कमकुवत ठरत असलेल्या गोलंदाजीला मोठी ताकद मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
IPL 2026 – चेन्नई सुपर किंग्जसाठी मोठी खूशखबर; विस्फोटक फलंदाज दुखापतीनंतर मैदान गाजवण्यासाठी सज्ज
दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू वानिंदू हसरंगा याच्याबाबत मात्र फारशी चांगली बातमी नाही. हसरंगा अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसून तो लवकरच मैदानावर परतेल अशी चिन्हे दिसत नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने अद्याप आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘एनओसी’साठी (NOC) अर्जही केलेला नाही. त्यामुळे लखनऊला हसरंगासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते किंवा त्याच्या पर्यायाचा विचार करावा लागू शकतो.
Comments are closed.