BCCI ची मोठी घोषणा, IPL 2026 चा धमाका लवकरच सुरू होणार; चाहत्यांची उत्सुकता वाढली
टी20 वर्ल्ड कपची जुगलबंदी संपल्यामुळे चाहत्यांना आता IPL 2026 चे वेध लागले आहेत. टी20 वर्ल्ड कपमधील चौकार आणि षटकारांच्या आतषबाजीसह चौफेर फटकेबाजी IPL मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याच पार्श्वभुमीवर BCCI चे सचिव देवजित सैकिया यांनी आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या 12 मार्चपर्यंत या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सैकिया यांनी IANS शी बोलताना आयपीएलच्या वेळापत्रकावर भाष्य केलं. “सध्या बीसीसीआय संपूर्ण हंगामाऐवजी केवळ पहिल्या 20 दिवसांच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.” असं ते म्हणाले. आगामी काळातील इतर महत्त्वाच्या घडामोडी किंवा निवडणुकांचे नियोजन लक्षात घेऊन हा टप्प्याटप्प्याने वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“आम्ही 12 मार्चपर्यंत आयपीएल 2026 चे वेळापत्रक जाहीर करण्याची योजना आखत आहोत. सध्या आम्ही पहिल्या 20 दिवसांसाठी आयपीएल 2026 चे वेळापत्रक जाहीर करणार आहोत,” असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी IANS ला सांगितले. pic.twitter.com/91eaQHAQP1
— IANS (@ians_india) 10 मार्च 2026
BCCI सचिवांनी दिलेल्या माहितीमुळे 12 मार्च रोजी होणाऱ्या या घोषणेकडे सर्व क्रिकेट प्रेमींचे डोळे लागले आहेत. पहिल्या 20 दिवसांच्या वेळापत्रकात कोणत्या संघांच्या लढती कधी आणि कुठे होणार, तसेच उद्घाटन सोहळा कोणत्या शहरात पार पडणार, हे स्पष्ट होईल. बहुदा त्यानंतर उर्वरित वेळापत्रकाची घोषणा केली जाईल, अशी शक्यता आहे.
Comments are closed.