अर्जुन तेंडुलकरची विकेट पडणार? IPL 2026 पूर्वी मुंबई इंडियन्सने फासे टाकले, बडा खेळाडू गळाला लावण्याचा प्रयत्न

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामाची तयारी सध्या जोमात सुरू आहे. फ्रेंचायझींना 15 नोव्हेंबर पूर्वी रिटेन्शन यादी जाहीर करायची असून या निमित्ताने आपापसात ट्रेडिंगही सुरू आहे. याच दरम्यान, आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सने मोठा डाव टाकला आहे.

मुंबई इंडियन्स मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला रिलीज करण्याची दाट शक्यता आहे. मुंबईचा संघ लखनौ सुपर जायंट्ससोबत ट्रेड करण्याच्या तयारीत असून अर्जुनच्या बदल्यात शार्दुल ठाकूर याला आपल्या संघात सामील करण्यास उत्सुक आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू आर. अश्विन यानेही आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना अनावधानाने उल्लेख केल्याने यास दुजोरा मिळत आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.