IPL 2026 – चेन्नईला सळो की पळो करून सोडणाऱ्या वैभव सूर्यवंशीने सांगितलं स्फोटक फलंदाजीचं रहस्य, म्हणाला…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का दिला. राजस्थानने एकतर्फी चेन्नईच्या बत्या गुल केल्या. या सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने चमकदार कामगिरी केली. त्याने अवघ्या 17 चेंडूत 52 धावांची धडाकेबाज खेळी करत सामना पूर्णपणे राजस्थानच्या बाजूने झुकवला. फक्त 15 चेंडूत अर्धशतक झळकावत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली.

सामन्यानंतर वैभवने आपल्या खेळीबद्दल बोलताना सांगितले की, पॉवर प्लेमध्ये आक्रमक खेळ करणे हाच त्यांचा मुख्य प्लॅन होता. सुरुवातीला विकेट थोडी अवघड वाटत होती, मात्र चेंडू जुना होत गेला तसं फलंदाजी करणे सोपे झाले. लहान लक्ष्याचा पाठलाग करताना पॉवर प्ले निर्णायक ठरतो, त्यामुळे त्याच टप्प्यात सामन्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने स्पष्ट केले.

IPL 2026 – शार्दुल, आता इथेच राहा! हार्दिकचा प्रेमळ सल्ला

यशस्वी जयस्वाल सोबतच्या भागीदारीबद्दल तो म्हणाला की, जयस्वाल सतत संवाद साधत होता आणि योग्य वेळी स्ट्राइक देत होता. कोचिंग स्टाफनेही नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिल्यामुळे आत्मविश्वासाने फलंदाजी करता आली. दरम्यान, चेन्नईचा संपूर्ण डाव 127 धावांवर बाद केल्यानंतर राजस्थानने अवघ्या 12.1 षटकांत लक्ष्य गाठत 8 विकेट्सने विजय मिळवला आणि स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली.

Comments are closed.