IPL 2026 च्या नीलामीत कोण ठरणार सर्वात महागडा खेळाडू? ऋषभ पंतचा 27 कोटींचा विक्रम मोडला जाणार

इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या सीजनचा (Indian premier league 2026 season 19) म्हणजेच आयपीएल 2026 चा बिगुल वाजलं आहे. पुढच्या महिन्यात आयपीएलच्या आगामी हंगामाची नीलामी होणार आहे. यावेळी मिनी ऑक्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. या नीलामीत अनेक सुपरस्टार खेळाडू सहभागी होत असल्यामुळे सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे की अखेर सर्वात महाग कोण खेळाडू विकला जाणार?

आयपीएल 2026 साठीची मिनी नीलामी 16 डिसेंबरला अबू धाबीतील एतिहाद अरेना येथे होणार आहे. बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्ट्सनुसार, सर्व 10 संघांनी मिळून 173 खेळाडूंना रिटेन केले आहे. यामध्ये 49 विदेशी खेळाडू आणि काही ट्रेड झालेले खेळाडूही आहेत. आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये 10 संघांकडे एकूण 77 रिकामे स्लॉट उपलब्ध आहेत. तर सर्व फ्रँचायझींच्या पर्समध्ये मिळून एकूण 237.55 कोटी रुपये शिल्लक आहेत.

आयपीएल 2026 च्या नीलामीत अनेक दिग्गज खेळाडूंची नावं आहेत. त्यात आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, मथीशा पथिराना, फाफ डू प्लेसिस आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी सर्व 10 संघांनी मिळून 70 खेळाडूंना रिलीज केले आहे. मिनी ऑक्शनमध्ये जास्तीत जास्त 77 खेळाडूच विकत घेतले जाऊ शकतात.

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत (Rishbh Pant) हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. मागील वर्षी लखनऊने त्याला तब्बल 27 कोटी रुपयांत खरेदी केले होते. सुमारे 24 कोटींना विकला गेलेला वेंकटेश अय्यर देखील यंदाच्या नीलामीचा भाग आहे. तसंच स्टार ऑलराउंडर आंद्रे रसेलही ऑक्शनमध्ये उतरला आहे.

यंदा मिनी ऑक्शन असल्यामुळे ऋषभ पंतचा 27 कोटींचा विक्रमी आकडा मोडणे कठीण मानलं जात आहे. मात्र, सर्वात महाग खेळाडू म्हणून तीन दिग्गजांमध्ये मोठी टक्कर आहे.आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर आणि कॅमरून ग्रीन. या खेळाडूंना विकत घेण्यासाठी संघ कोणतीही मोठी रक्कम मोजण्यास तयार असू शकतात.

Comments are closed.