IPL 2026: राजस्थान रॉयल्सने दासुन शनाकाचा संघात समावेश, इतक्या कोटींचा सौदा
शनाका राजस्थानमध्ये 2 कोटी रुपयांमध्ये सामील होणार आहे. त्याने श्रीलंकेसाठी सहा कसोटी, 71 एकदिवसीय आणि 131 T20I सामने खेळले आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 3350 हून अधिक धावा आणि 86 विकेट्स आहेत. शनाकाने नुकत्याच झालेल्या T-20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व केले होते.
शनाका पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर संघाकडून खेळणार होता. पण राजस्थान संघात सामील होण्यासाठी त्याने त्या स्पर्धेतून माघार घेतली. शनाका याआधी गुजरात टायटन्सकडून आयपीएल खेळला आहे.
Comments are closed.