IPL 2026 मधील सर्वात महागडा खेळाडू कॅमरून ग्रीन ऍशेस मालिकेत फ्लॉप! ‘या’ 12.50 कोटींच्या गोलंदाजाने केले बाद

आयपीएल 2026 (IPL 2026) च्या लिलावात कॅमरून ग्रीनवर (Camron green) विक्रमी बोली लागली. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने त्याला तब्बल 25.2 कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या संघात सामील करून घेतले. यासह तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मात्र, इतकी मोठी रक्कम मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कॅमरून ग्रीन इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरला.

17 डिसेंबरपासून सुरू झालेल्या ॲशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्यात, ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवशी ग्रीन फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, तो विशेष काही करू शकला नाही आणि शून्य धावांवर (डक) बाद होऊन माघारी परतला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) त्याला बाद केले. विशेष म्हणजे, राजस्थान रॉयल्सने आगामी हंगामासाठी आर्चरला 12.50 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. 12.50 कोटींच्या या गोलंदाजापुढे 25.2. कोटींचा फलंदाज पूर्णपणे हतबल दिसला.

ग्रीन व्यतिरिक्त, केकेआरने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथीराना याला 18 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले आहे. यापूर्वी पथीराना चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) भाग होता. चालू मालिकेतील गेल्या दोन डावांत ग्रीनने 45 आणि 24 धावा केल्या होत्या, मात्र तो अद्याप मोठी खेळी करू शकलेला नाही. त्याने 21 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत 32.56 च्या सरासरीने 521 धावा केल्या असून 12 विकेट्स घेतल्या आहेत.

29 आयपीएल सामन्यांत त्याने 707 धावा केल्या असून 16 विकेट्स घेतल्या आहेत. कॅमरून ग्रीनने 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते, तर 2024 मध्ये तो आरसीबीकडून खेळला होता. 2025 च्या हंगामात त्याने सहभाग घेतला नव्हता, पण आता IPL 2026 मध्ये तो केकेआरच्या जर्सीत दिसणार आहे.

Comments are closed.