विकेट घेताच नडतो, सगळ्यांना भिडत सुटतो; दिग्वेश राठीला आतापर्यंत कोणालाही न मिळालेली शिक्षा सुनावली

आयपीएल 2025 च्या हंगामातील लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या (LSG vs SRH) सामन्यात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाला.

लखनौचा गोलंदाज दिग्वेश राठी आणि हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्मा सामना सुरु असताना (Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight) भर मैदानात एकमेकांना भिडले. यावेळी अंपायरसह लखनौ आणि हैदराबादच्या इतर खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली.

दिग्वेश राठीने (Digvesh Rathi) अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) बाद केल्यानंतर दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं. अभिषेक बाद झाल्यानंतर दिग्वेश सतत काहीतरी बोलत होता. यावेळी अभिषेक शर्माही त्याला नडला.

यादरम्यान अभिषेक आणि दिग्वेश एकमेकांवर हात उचलणार की काय?, असं क्रिकेट चाहत्यांना वाटलं. परंतु तेवढ्यात ऋषभ पंत आला आणि त्याने दिग्वेशला मागे खेचले आणि त्याला समजावले.

अभिषेक रागाने त्यांच्याकडे हातवारे करत मैदानाबाहेर गेला. दिग्वेश राठीचे केस मोठी आहेत. त्यामुळे अभिषेक शर्मा दिग्वेश राठीकडे रागाने बघत आणि केस पकडेल...असे हातवारे करत मैदानाबाहेर गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अभिषेक रागाने त्यांच्याकडे हातवारे करत मैदानाबाहेर गेला. दिग्वेश राठीचे केस मोठी आहेत. त्यामुळे अभिषेक शर्मा दिग्वेश राठीकडे रागाने बघत आणि केस पकडेल…असे हातवारे करत मैदानाबाहेर गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, सामना संपल्यानंतर, दिग्वेश आणि अभिषेक यांनी हस्तांदोलन केले आणि त्यांच्यात काही संवाद झाला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील अभिषेक आणि दिग्वेशचे दोघांचे बोलणे ऐकताना दिसले.

दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्माच्या वादावर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला न झालेली शिक्षा दिग्वेश राठीला सुनावण्यात आली आहे. दिग्वेश राठीला एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. दिग्वेश आता लखनौ सुपर जायंट्सच्या पुढील सामन्यात खेळू शकणार नाही. तसेच मॅच फी पैकी  50 टक्के दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. याशिवाय सध्या त्याच्या नावावर 5 डिमेरीट पॉईंट असल्यानं त्याचं गुजरात टायटन्सचं निलंबन करण्यात आलं.

दिग्वेश राठीवर यापूर्वी देखील आयपीएलकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्याला केवळ आर्थिक दंड आकारण्यात आला होता.

सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्मालाही आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात अभिषेकचा कलम 2.6 अंतर्गत हा पहिलाच लेव्हल 1 गुन्हा होता आणि त्यामुळे त्याला एक डिमेरिट पॉइंट मिळाला आहे. लेव्हल 1 च्या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास, मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.

यंदाच्या आयपीएलमध्ये दिग्वेश राठी विकेट घेतल्यानंतर अनेक खेळाडूंसोबत भिडताना दिसला.

येथे प्रकाशितः 20 मे 2025 01:54 दुपारी (आयएसटी)

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..

Comments are closed.