IPL: वीरेंद्र सेहवागपासून अक्षर पटेलपर्यंत, DCच्या सर्व कर्णधारांची यादी!

Complete list of Delhi Capitals captains: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या नवीन हंगामापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे. दिल्ली संघाने चाहत्यांना बराच वेळ वाट पाहायला लावली. हंगाम सुरू होण्याच्या आठ दिवस आधी त्यांनी त्यांच्या कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे. फिरकी अष्टपैलू अक्षर पटेलकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. केएल राहुल हा कर्णधारपदासाठी आघाडीवर असल्याचे मानले जात होते परंतु अलिकडच्या वृत्तानुसार राहुलने स्वतः कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिला आहे.

अक्षर या संघाचा 14वा कर्णधार बनला आहे. लीगच्या पहिल्या हंगामापासून खेळत असलेल्या दिल्ली संघाचे कर्णधारपद अनेक खेळाडूंनी भूषवले आहे, परंतु आजही वीरेंद्र सेहवाग हा एकमेव खेळाडू आहे ज्याने 50 किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये या संघाचे नेतृत्व केले आहे. पहिल्या हंगामात सेहवागला कर्णधार बनवण्यात आले आणि त्याने 52 सामन्यांमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले ज्यापैकी संघाने 28 सामने जिंकले आणि 24 सामन्यात पराभव पत्करला. यानंतर, गौतम गंभीरने 25 सामन्यांमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले, त्यापैकी 12 सामन्यात विजय मिळवला आणि 13 सामन्यात पराभव पत्करावा लागला. रिषभ पंत हा दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक सामन्यांमध्ये या संघाचे नेतृत्व करणारा खेळाडू होता. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने एकूण 43 सामने खेळले, त्यापैकी 23 जिंकले, 19 गमावले आणि एक सामना बरोबरीत सुटला.

दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व कर्णधारांची संपूर्ण यादी

वीरेंद्र सेहवाग – 52 सामने, 28 विजय, 24 पराभव
गौतम गंभीर – 25 सामने, 12 विजय, 13 पराभव
दिनेश कार्तिक – 6 सामने, 2 विजय, 4 पराभव
जेम्स होप्स – 3 सामने, 0 विजय, 2 पराभव
महेला जयवर्धने – 18 सामने, 6 विजय, 12 पराभव, 1 बरोबरी
रॉस टेलर – 2 सामने, 0 विजय, 1 पराभव
डेव्हिड वॉर्नर – 16 सामने, 5 विजय, 11 पराभव
केविन पीटरसन – 11 सामने, 1 विजय, 10 पराभव
जेपी ड्युमिनी – 16 सामने, 6 विजय, 9 पराभव
झहीर खान – 23 सामने, 10 विजय, 13 पराभव
करुण नायर – 3 सामने, 2 विजय, 1 पराभव
श्रेयस अय्यर – 41 सामने, 21 विजय, 18 पराभव, 2 बरोबरी
रिषभ पंत – 43 सामने, 23 विजय, 19 पराभव, 1 बरोबरी
अक्षर पटेल – 1 सामना, 0 विजय, 1 पराभव

Comments are closed.