2 वर्षांत आयपीएलमुळे बीसीसीआयला कोटींचा फटका! जाणून घ्या सविस्तर

इंडियन प्रीमियर लीगला (IPL) सलग दुसऱ्या वर्षी तोटा झाला आहे. फक्त दोन वर्षांत IPLच्या मूल्यांकनात 16 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. रिपोर्टनुसार, 2025 मध्ये IPLच्या मूल्यांकनात 8 टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे हा प्रश्नही निर्माण झाला आहे की, IPLचा क्रेझ आता कमी होतो आहे का?

म्हत्वाची गोष्ट म्हणजे की, आयपीएल स्पर्धा दीर्घकाळापासून जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे.

आयपीएल आणि डब्लूपीएल मूल्यांकन रिपोर्ट 2025′ मध्ये उघड झाले की, 2023 मध्ये आयपीएलचे मूल्यांकन 92,500 कोटी रुपये होते, परंतु 2024 मध्ये ते 10.6 टक्क्यांनी घटून 82,700 कोटी रुपये झाले. आता सलग दुसऱ्या वर्षी, म्हणजे 2025 मध्ये आयपीएलचे ब्रँड मूल्य 8 टक्क्यांनी घटून 76,100 कोटी रुपये झाले आहे.

ब्रँड मूल्य कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यात मीडिया राईट्सचे विलीन होणे मुख्य कारण असू शकते. 2024 मध्ये Viacom18 आणि डिस्ने स्टार एकत्र झाले आणि त्यानंतर जिओ हॉटस्टार लॉन्च झाले. या विलिनीकरणामुळे दोन वर्षांत आयपीएलला सुमारे 16,400 कोटींचा तोटा झाला आहे.

या दोन मोठ्या कंपन्यांच्या हातात मीडिया राईट्स गेल्याने थोड्या प्रमाणात बाजारपेठेत एकाधिकार निर्माण झाला आहे.

मीडिया राईट्समुळे IPLला मोठी कमाई होते, पण फँटेसी आणि ऑनलाइन गेमिंग कंपन्यांचे बंद होणे यामुळे आयपीएलची कमाई प्रभावित झाली आहे. ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर बंदी लागल्यामुळे आयपीएलच्या ब्रँड मूल्यावर सुमारे 1,500–2,000 कोटी रुपयांचा परिणाम झाला आहे.

महिला प्रीमियर लीग (WPL)ने महिला क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत WPLच्या ब्रँड मूल्यात 5.6 टक्क्यांची घट झाली आहे. महिला प्रीमियर लीगची ब्रँड मूल्य आता 1,350 कोटी रुपयांवरून घटून 1,275 कोटी रुपये झाली आहे.

Comments are closed.