18 वर्षांची IPL कमाई! आर. अश्विन झाले किती कोटींचे मालक?
आर. अश्विन यांनी अलीकडेच इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तब्बल 18 वर्षे ते ही लीग खेळले, पण आता त्यांनी आपल्या करिअरबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2025 मध्ये अश्विन चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसले होते आणि हाच त्यांचा शेवटचा हंगाम ठरला. इतक्या वर्षांत अश्विन यांनी आयपीएल मधून कोट्यवधींची कमाई केली आहे आणि एकूण रक्कम ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
आर. अश्विन यांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपला पदार्पण सामना 2009 साली खेळला होता. मात्र, 2008 मध्ये त्यांना चेन्नई सुपर किंग्सने करारबद्ध केले होते, पण त्यावेळी खेळण्याची संधी मिळाली नव्हती. सुपर किंग्सव्यतिरिक्त त्यांनी रायझिंग पुणे सुपरजायंट, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल मध्ये खेळ केले आहेत. या काळात त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत. गेल्या वर्षी त्यांना त्यांच्या IPL करिअरमधील एका हंगामात सर्वाधिक पैसे मिळाले. सीएसके ने त्यांना तब्बल 9.75 कोटी रुपयांत आपल्या संघात सामील केले होते. खाली त्यांच्या आयपीएल मधील प्रत्येक वर्षाची पगाराची माहिती दिली आहे.
अश्विन यांनी आयपीएल मधील आपल्या 17 वर्षांच्या करिअरमध्ये 221 सामने खेळले. त्यांनी 187 बळी घेतले असून त्यांचा गोलंदाजी सरासरी 30.22 इतका राहिला आहे. अश्विन यांनी 7.20 या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे आणि केवळ एकदाच 4 बळींची कमाई केली आहे. फलंदाजीत अश्विन यांनी 98 डावांत 833 धावा केल्या असून ते 34 वेळा नाबाद राहिले आहेत. त्यांच्या नावावर आयपीएल मध्ये एक अर्धशतकदेखील नोंदलेले आहे.
Comments are closed.